Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहराच्या मध्यतर्वी भागातील फरासखाना पोलीस हद्दीत ३ लाखाची घरफोडी, मुद्देमालासहित आरोपी २४ तासात गजाआड

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहराच हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हटल जात तो मध्यवर्ती भाग फराखाना पोलीस स्टेशनच्या नियंत्रणात आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी ही फरासखाना पोलीसांवर आहे. जे वस्तु पुणे शहरात कुठेही सापडत नाहीत ते पुण्याच्या मध्यवर्ती पेठात अगदी सहज उपलब्ध होते असा नावलौकिक आजही या भागाचा आहे. त्यामुळेच जुन्या काळातील नामचिन भाई आणि डॉनचा देखील याच भागात डेरा आहे. कुठं जरी खुट्ट वाजलं तरी सगळा परिसर ऍलर्ट होतो असंही या भागाच वैशिष्ठ आहे. अशा या वैशिष्ठ्यपूर्ण भागात चोरी तर सोडाच परंतु रस्त्यावर थांबलेल्या हातगाडीवरून एखादी वस्तु लंपास करणे दुरच. पळून पळून कुठे जाईल असंही म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. अगोदरच रस्ते चिंचोळे आहेत. रस्त्यावर धड निट चालता येत नाही, तिथं दुचाकी आणि चारचाकी वाहनांना तर कसरतच करावी लागते. अशा या वैशिष्ठ्यपूर्ण मध्यवर्ती भागात ३ लाखाची घरफोडी झाली.


घरफोडीच्या घटनेनं सगळा परिसर ऍलर्ट झाला. आमच्या इलाख्यात नेमकं कुणी बरं हा प्रताप केला असावा असा अंदाज बांधणे सुरू होते. पोलीस खाते कमी पण इतरांचीच अधिक चर्चा घडली. आम्ही इथ बसलेलं असतांना, आमच्याच इलाख्यात येवून चोरी करण्याचं धाडस नेमकं कुणी केलं म्हणून सगळा परिसर दणाणून गेला. कसबा पेठेतील एका ५७ वर्षाच्या महिलेने तक्रार दिली की, त्यांचे राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असतांना, कोणतीही अज्ञात इसमाने घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून सोन्या चांदीचे २ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास फराखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस उप निरीक्षक एन.बी. पाटील यांच्याकडे होता.
दाखल गुन्ह्यामध्ये फरासखाना पोलीस कसोशिने तपास करीत होते. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जयवंत उर्फ जयड्या गायकवाड याच्याबाबत माहिती मिळाल्यावरून फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, श्री. चौधरी, दिघे व इतर स्टाफसह डीपी रोड औंध येथे छापा घातला. जयड्या गायकवाड याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक तपास करता त्यानेच फरासखाना हद्दीत घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याच्याजवळील ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचा सोने चांदीचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली.


वरीष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शना नुसार पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, बापू खुटवड, सयाजी चव्हाण, अमोल सरडे, आकाश वाल्मीकी, मोहन दळवी, सचिन सरपाले, अभिनय चौधरी ऋषिकेश दिघे, पंकज देशमुख गणेश आटोळे यांनी कामगिरी चोख बजाविली.