Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवाऽऽऽ

police duty

पुणे- खडकी/दि/

                खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व गैर कारभाराबाबत थेटच गृहमंत्रालयापर्यंत अनेक तक्रारी गेलेल्या आहेत. आपले सरकार पोर्टलपासून ते लोकायुक्तापर्यंत प्रतित्रापत्राव्दारे तक्रारी केल्याने, सध्या खडकीतील अवैध व गैरधंदे अंशतः चालु आहे. सध्या मोहित्यांसारखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आल्याने त्यांना काबूत ठेवण्याची कला अजून एकाही वसूलदाराकडे नाहीये. त्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे शब्दच. बंद म्हणजे बंदच.  त्यामुळे सध्या खडकी बंद असली तरी अप्पा बंद ठेवतील तर नवलच. पिकल्या पानाचा देठ कीहो हिरवा…असे सांगण्यात येते की, सध्या काळा बाजार बंद असला तरी अप्पा पान टपर्‍यांवरून नियमित वसूली करीत असल्याचे दिसून येत आहे. एका एका पान टपरीवाल्याकडून पूर्वी अप्पा ३००० हजार रुपये घ्यायचे म्हणे. धंदे बंद झाल्यानंतर त्यांच्याकडे पाच हजार रूपयांची मागणी होत आहे.

                सध्या खडकीत ७० ते ८० पान टपर्‍या आहेत. त्यामुळे तीन हजार रुपयांप्रमाणे हिशोब केल्यास तरीही ती संख्या लाखाच्या घरात जाते. आता ही वसूली कुणाच्या नावाने होतेय. मोहितेंच्या नावाने की अप्पाची कीऽऽ महाडीकांच्या नावाने होत आहे…

                सगळं बंद केलं तरी अप्पाचा छंद काही सुटत नाही कितीही कडक पीआय आले तरी वसूली थांबत नाही. उगाच ते सांगत नाहीत… मी पोलीस खात्यातील ३१ वर्षापैकी २८ वर्षे उगाच वसुली करीत नाहीये. माझ्यात वसूलीचा दम आहे म्हणून मी वसूली करीत आहे. कारवाई करायची तर करून दाखवा. असे स्पष्टच ते वरीष्ठांना सुनावत असतात. मोहित्यांना हे माहिती असेल तर आनंदच आहे. परंतु नसेल तर मेमो बाहेर येणार काय…