अहमदनगर (अकोला)/दि/
वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूद्ध अनकर असे दोन उमेदवार राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले. भिंगे बनकर हे राजकीय प्रलोभनाला बळी पडले असून, या दोघांचेही राजकारण शॉर्ट टाईम टर्मचेच आहे आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाडोत्री नेत्यांचीच गरज पडते असे मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने राज्यात सक्षम पर्याय उभा केला आहे. ही चळवळ बांधतांना अनेक नेत्यांना घडविले. महाराष्ट्रा समोर उभे केले. त्यांनी लाखालाखांच्या सभा घेतल्या, पण ते वंचितला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीला काहीच फरक पडत नाही. भगदाड तर मुळीच नाही. जे वंचित मध्ये असतांना, लाखांची सभा घेत होत, ते दुसर्या पक्षात गेल्यावर कुचकामी ठरल्याचीच उदाहरणे आहेत. अशी मंडळी राजकीय प्रलोभनाला बळी पडतात. त्यांचे राजकारणच मुळी शॉर्ट टाईम टर्मसाठी असते. ती टर्म संपली की ते संपतात. अशी उदाहरणे आहेत. त्यामध्येच भिंगे व बनकर यांची गणती असल्याचे यांनी स्पष्ट केले.
वंचित च्या तिकिटावर नांदेड लोकसभेची निवडणूक लढविलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपुर येथून वंचित च्या तिकीटावर विधानसभा लढविलेले अनिरूद्ध वनकर यांची नावे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठविली आहेत.
अनलॉकची नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यात त्यांनी मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र केंद्र सरकारचे ऐकायचेच नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मॉल, मदिरा, सुरू केले आहे. तेथून कोरोना पसरत नाही आणि मंदिरे उघडली तर कोरोना कसा होईल असा प्रश्न त्यांनी विचारला. आचार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आचार्य उपमुख्यमंत्री व आचार्य बाळासाहेब थोरात असा उपरोधिक नामोल्लेख करून या आचार्यांना हरिभक्त पारायण मंडळींची ऍलर्जी झाल्याचा आरोप बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.