Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री

raval

मुंबई/दि/ राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्न पदार्थातील भेसळीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी क्शन मोडवर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

       अन्न व औषध प्रशासन विभाग हा समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारा विभाग आहे. राज्यातील अन्न व औषधाची सुरक्षितता ही जबाबदारी आपल्या विभागावर आहे.

       सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील सर्व अधिकार्‍यांनी विविध विभागाच्या समन्वयाने टाइम बाऊंड पद्धतीने कामाचे नियोजन करून मिथ्याकरण व भेसळीचे उच्चाटन करावे. ते काल झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. 

       अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र आढावा बैठक वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन भवन येथे मंत्री श्री.रावल यांनी घेतली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ.पल्लवी दराडे यांचे सह दोन्ही विभागाचे राज्यातील सहआयुक्त व सहायक आयुक्त उपस्थित होते.

       यावेळी मंत्री श्री.रावल म्हणाले की, अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जबाबदारीने काम केले पाहिजे. विशेषतः दूध, तेल, मिठाई आदी अन्न पदार्थांतील  भेसळ ही गंभीर बाब आहे. ज्या ठिकाणी दूधभेसळ आढळल्यास त्या कार्यक्षेत्रातील आधिकार्‍यावरही जबाबदारी निश्चित करून कार्यवाही केली जाईल. दुधाच्या बाबतीत जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. ऍक्शन प्लान च्या माध्यमातून  राज्यात आणि विशेषतः मुंबईत काही ठिकाणी होणारी दुधातील भेसळ रोखणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच अन्न सुरक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्न सुरक्षा पंधरवडा राबण्यात येईल. लोकांना रसायनमुक्त अन्न मिळण्यासाठी या संबंधित विभागातील अधिकारी व लोकांशी चर्चा करून रसायनमुक्त फळे, भाजीपाला, देण्याच्या दिशेने काम केले पाहिजे, असेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.