Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अंगमेहनती, कष्टकरी, कामगार व हमालांना गुन्हेगार ठरविणार्या, मार्केटयार्ड युनियनच्या सचिवावर गुन्हे दाखल करा

market yard pune

मार्केटयार्ड पोलीस स्टेशनने मोघम तक्रार अर्जांवर किती जणांना गुन्हेगार बनविले….

बाजार समितीतील कर्मचार्‍यांकडून गुन्हेगारांना हाताशी धरून स्थानिक कामगारांचा छळ, परप्रांतियांना परवानगी नसतांना देखील बाजार आवारात राहण्याची बेकायदा सुविधा निर्माण केली.

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

       छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर  नगर, प्रेमनगर, गुलटेकडी व परिसरातील झोपडपट्ट्यांतील स्थानिक नागरीकांना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील बाजार पेठेत बाजार आवारातील झाडू कामे, दुकाने व गाळ्यांची साफसफाईची कामे, धान्य, फळे व इतर मालांची पॅकींग करणे, सुरक्षा रक्षक, आऊटसोर्सिंगव्दारे भरण्यात येणारी बाजार समितीतील पदे, गटई व कटलरी मालाचे स्टॉल आदिंसारखी कामे मिळावी यासाठी प्रयत्न करणार्‍या स्थानिक युवकांवर खोट्या तक्रारी व बनावट स्वरूपाच्या मोघम तक्रारी पोलीस ठाण्यात करून त्यांचा छळ केला जात आहे. ह्या सर्व प्रकारात कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही कर्मचारी तसेच कामगार युनियनचे पदाधिकारी जाणिवपूर्वक स्थानिकांना रोजगार नाकारून, परप्रांतियांना कामे दिली जात आहेत. ज्यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, बाजार समिती यांच्याकडे तक्रार अर्ज दिले आहेत, ते बाजारातील व्यापारी नाहीत, आडते, दलाल, कमिशन एजंटही नाहीत. बाजार क्षेत्राबाहेरील तसेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांनी मोघम स्वरूपाच्या तक्रारी करून स्थानिक कामगारांना त्रास दिला जात आहे.

       मार्केटयार्ड युनियनचे सचिव श्री. नांगरे यांनी एक पत्रक मागील आठवड्यात प्रसिद्धीला दिले होते. ते पत्रक पुण्यातील दैनिक प्रभात व दै. सकाळ वृत्तपत्रात बातम्या छापून आलेल्या आहेत. त्यात नमूद केले आहे की,  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटच्या डाळींब यार्डात हमाल, कामगार व खरेदीदार यांना गुन्हेगार शिवीगाळ करून धमक्या देत आहेत, मारहाण व खंडणी मागण्याचे प्रकार होत असल्याचे नमूद केले आहे. तसेच हा सर्व प्रकार १. पिंटूसिंग दुधानी, २.महेश गायकवाड, ३.आरबाज बागवान व ४.सचिन मंडलिक करीत असल्याचे नमूद आहे.

       मार्केटयार्ड युनियनने जाणिवपूर्वक स्थानिक कामगारांची नावे घेतली आहेत. वरील चारही कामगारांबाबत कोणत्याही व्यापार्‍याने, हमाल, कामगार, वा खरेदीसाठी आलेल्या नागरीकांनी कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये किंवा बाजार समितीकडे तक्रार नोंदविलेली नाही. उलट मार्केटयार्ड युनियनचे सदस्य असलेले १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे यांच्याविरूद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे भा.द. वी. ३०७ व ३४ अ तसेच ५०४ व ५०६ नुसार गुन्हे दाखल आहेत.तसेच शिवाजीनगर न्यायालयातील मे. गोसावी कोर्ट येथे केस क्र. ४४५/१८ नुसार कोर्ट केस सुरू आहे. तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २४०/१७  नमूद आहे.

       दरम्यान २० जुन २०१९  रोजी देखील या तीनही गुन्हेगार इसमांनी पुन्हा वरील चार कामगारांबद्दल मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे खोटी व बनावट तक्रार दिली आहे. शिवाय मार्केटयार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी वरील चार कामगारांची नावे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमिचे लोकच कामगार युनियनमध्ये असतांना, तेच व्यापारी, कामगार व हमालांना दमबाजी व दहशतीखाली ठेवत आहेत.

       कामगार युनियन मार्केटयार्डचे सचिव संतोष नागरे यांनीच  १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे या तीन गुन्हेगारांना बाजार समितीमध्ये घेवून आलेले आहेत.  यांच्या मार्फतच व्यापारी, दलाल, आडते, तसेच हमाल व कामगारांना धमकाविले जात आहे. त्यांच्या विरोधात कुणी बोललेच तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे डाळींब यार्डातील कर्मचारी १. श्री. दत्तात्रय कळमकर व २. बाबा बिबवे हे दोन कर्मचारी हमाल व कामगारांना बाजारात येण्यास मज्जाव करतात. तसेच व्यापार्‍यांना सांगुन, न्याय मागणार्‍या कामगार व हमालांना कामे देवू नका, कामावर ठेवू नका, जर कुणी यांना काम दिले तर त्याला बाजारातून हाकलुन लावले जाईल असे धमकाविले जाते. याबाबतची तक्रार रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. बी.जे. देशमुख यांचेकडे लेखी स्वरूपात दिली आहे.

       दरम्यान मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. ०२/१८ नुसार पिंटूसिंग दुधानी यांच्या विरूद्ध भा.द.वी नुसार खंडणी, मारहाण करणे, धमकी देणे अशा बनावट तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी पिंटुसिंग दुधानी यांच्या विरूद्ध भा.द.वी. ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला होता. याची सुनावणी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, फौजदारी न्यायालय क्र. ८ यांच्या न्यायालयात नियमित फौजदारी खटका क्र. २४१६/२०१८ कोर्ट केस चालली. परंतु पीठासीन अधिकारी श्रीमती एस.एस. मतकर यांनी ८/५/२०१९ रोजी पिंटूसिंग दुधानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ही माहिती मार्केटयार्ड पोलीस स्टेशन व कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना कळविली आहे. ही बाब संतोष  नांगरे यांना माहिती आहे. तरीही पुन्हा जुन २०१९ रोजी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे याच स्वरूपाची तक्रार नोंदविली आहे. ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनीच पुन्हा मार्केंटयार्ड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. निर्दोष मुक्तता केल्यानंतर पुन्हा त्याच त्याच स्वरूपाची तक्रार देण्याचा नेमका संतोष नांगरे व १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे या तीन गुन्हेगारांचा नेमका हेतू काय आहे हे पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांची तपासणे आवश्यक आहे.

कामगार व हमालांचा पोलीसांकडून कसा काटा काढला जातो हे पहा –

मार्केटयार्ड कामगार युनियन व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांच्या साथ संगनमताने आजपर्यंत आंबेडकरनगरात ६० पेक्षाही अधिक गुन्हेगार निर्माण केले –

       खरं तर गुन्हेगारांचे पूर्णपणे निर्मूलन व्हावे व पुणे शहर सुरक्षित राखण्याचे काम पुणे शहर पोलीस दलाचे आहे. तथापी बाजार समितीतील काही कर्मचारी, कामगार युनियनचे पदाधिकारी यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन बरोबर साथ संगनमताने स्थानिक हमाल व कामगारांना देशोधडीला लावण्याचे सुत्र निर्माण केले आहे. खरं तर ही बाब मूळातून समजुन घेतली तर देशद्रोहाच्या आरोपाखाली या सर्वांना अटक होवू शकते.

       बाजार समिती कर्मचारी व युनिनयचे पदाधिकार्‍यांना कमिशन न दिल्यास, बाजारातील व्यापार्‍यांना सांगुन स्थानिक कामारांना कामे दिली जात नाही. जे कर्मचारी  न घाबरता काम करतात, त्यांचा पोलीसांकडून काटा काढला जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित हमाल व कामगाराच्या नावाने खंडणी मागतो, व्यापार्‍यांना धमकी देतो, बाजारात खरेदीसाठी आलेल्यांना शिवीगाळ व दमदाटी करतो अशा प्रकारची बनावट तक्रार केल्यानंतर, मार्केटयार्ड पोलीस, संबंधितांना घरातून उचलुन आणतात. त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन, दमात घेतले जाते. खंडणी मागितली म्हणून खडकी किंवा इतर हॉटेलमध्ये दिवस-दिवसभर कोंडून ठेवले गेले आहे. ह्याची कमीत कमी ३०/४० कामगारांची पोलीस दप्तरी कुठेही नोंद नाही. परंतु घडले असल्याची माहिती काहींनी दिली आहे.

       दरम्यान काही हमाल व कामगारा संदर्भांत तक्रार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता, त्याच्या विरूद्ध भरमसाठ गुुन्हे दाखल करून, कोर्टात प्रकरण पाठविले जाते. वर्षानुवर्षे कोर्ट केस चालते. वेगवेगळ्या प्रकारचा जबरी मानसिक व शारिरीक त्रास दिला जातो. त्यामुळे कित्येक  स्थानिक हमाल व कामगार बाजारात पायही ठेवत नाही. काहीं कामगारांची न्यायालयाने सुटका केली आहे. तरही पुन्हा २० जुन रोजी वायदंडे व शिंदे यांनी तक्रार केली. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलीसांनी तरी देखील भा.द.वी. १४९ ची नोटीस देवून संबंधित कामगार व हमालांना पुन्हा गुन्ह्यात अडकावुन ठेवले आहे. याबाबत पुढील अंकात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

       दरम्यान दैनिक प्रभात व दैनिक सकाळ या वृत्तपत्रात १. पिंटूसिंग दुधानी, २.महेश गायकवाड, ३.आरबाज बागवान व ४.सचिन मंडलिक या अंगमेहनी, कष्टकरी हमाल व कामगारांची नावे गुन्हेगार म्हणून प्रसारीत झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना धक्का बसला आहे. हातावरचे पोट आहे. बाजारात जे काम मिळेल ते काम करून स्वतः व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. शिवाय स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. परप्रांतियांना कामे देवू नका, आम्हाला पाहिजे ते पडेल काम दया, आम्ही ते काम करतो. असे विनवणी ते करीत आहेत.

       परंतु मार्केटयार्ड युनियनचे सचिव संतोष नागरे व  १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे हे तीन गुन्हेगार इसम व्यापारी, हमाल व कामगारांना धमकावुन त्यांच्याकडून पँकीग, गाडी भरणे व उतरविणे या कामातील कामगारांकडून प्रत्येक नगामागे रक्कम मागत आहेत. त्यामुळे संतोष नांगरे तसेच  १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे या तीन गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत पोलीस प्रशासन तसेच कृषी  उत्पन्न बाजार समिती यांनी संतोष नांगरे व तीन गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी दिला आहे. (क्रमशः)