Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्या!

ajit pawar1

मुंबई/दि/  देशभरात ईव्हीएम घोटाळ्याचे वादळ उठले असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही ईव्हीएमविरोधात सूर लावला आहे. लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणी केली आहे.

       केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेत नाराजी असतानाही सतराव्या लोकसभेत एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्याने हा ईव्हीएमचा विजय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यात आता पवार यांनी आज ट्विट करून ईव्हीएमला विरोध केला. ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, अशी नागरिकांच्या मनात शंका आहे. जगातील प्रगत देशांमध्ये निवडणूक मतपत्रिकेवर घेतल्या जातात. त्यामुळे विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवरच घेण्यात यावी, अशा मागणीचे ट्विट पवार यांनी केले आहे.