Thursday, February 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर युनिट 3 ची कामगिरी, तीन गावठी पिस्टल सह 12 जीवंत काडतुसासह रेकॉर्डवरील आरोपीस अटक

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्यात 19 जानेवारी रोजी साजरी होत असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखा युनिट तीनने दमदार कामगिरी केली असून खुनासारख्या गंभिर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीस जेरबंद केले असून त्याच्याकडून सुमारे 3 गावठी पिस्टलसह 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नांदेड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी कामगिरी केली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि. 18 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे असे वरिष्ठांच्या आदेशाने आगामी शिवजंयती उत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने अवैध धंदे, मोक्का पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार चेक करुन कारवाई करणेकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नार्देड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत होते.

दरम्यान  पोलीस अमंलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे सागर दत्तात्रय सोनलकर वय 25 वर्ष (रा. मुळ पत्ता प्रसाद पार्क समोर, डिएसके पायथा, धायरी, पुणे सध्या रा. सिध्दीविनायक सोसायटी, प्लॅट नंबर 401, अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे पुणे) यांच्या ताब्यातुन 3 गावठी पिस्टल व 12 जिवंत काडतुस अवैधरित्या बेकायदेशिररित्या बाळगलेले असताना प्रयेजा सिटी, वडगाव बु. पुणे मिळुन आल्याने त्यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडुन सदरची अग्निशस्त्रे हस्तगत करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करुन पुढील कारवाईकरीता नऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) पुणे शहर. श्री निखिल पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. शैलेश संखे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अमंलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांनी कामगिरी केली आहे.