Monday, February 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

विश्रामबागचे पोलीसच हुश्शार ….. विश्रामबाग पोलीसांनी कसब पणाला लावली, सोने चोरास केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील एक महिला दि. 2 फेब्रुवारी रोजी आंबेडकर चौक, जकात नाका, वारजे बसस्टॉप ते शनिवारपेठ दरम्यान पीएमपीएलएल बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसमधील गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांच्या उजव्या हातातील 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेल्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. स्थानिक चोर त्यांच्याच हद्दीत चोरी करणार नाहीत याची पक्की खात्री होती. त्यामुळे हा चोर कुठला बाहेरचाच असू शकतो याची पक्की खुणगाठ विश्रामबागच्या पोलीसांनी लावली आणि त्यानंतर तपासाला गती दिली.

 शहराच्या मध्यवर्ती भागात चोरी झाल्याने सर्व पोलीस खाडक्न जागे झाले. तसेच  सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत प्रभारी प्रदिप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी अंमलदार यांना सुचना दिल्या. या तपास पथकातील राजेश उसगावकर, सहा. पोलीस निरीक्षक व अंमलदार तपास करीत असताना पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांना सीसीटीव्ही पाहुन संशयित आरोपीची माहिती मिळाल्याने तसेच विश्रामबाग तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना गोपनीय बातमी मिळाल्याने सदरचा गुन्हा आरोपी 

1) बसवराज विजय सुतार, वय 25 वर्षे, (रा. पोटेक क्लासेस शेजारी, केशव नगर पोलीस चौकी जवळ, केशवनगर मुढंवा पुणे 36)
2) कृष्णा रमेश माने, वय 45 वर्षे, (रा. सरोदय कॉलनी, दर्गाचे मागे, मुंढवा पुणे)

 यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या आरोपीतांकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडून एकूण 5 लाख 87 हजार रुपये किंमतीचे सुमारे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने हस्तगत करण्यात आले असून एकुण 03 गुन्हे उघडकीस आणले आहेत.


ही दमदार कारवाई  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री अरुण घोडके, यांच्या सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, आशिष खरात, सागर मोरे, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख व अर्जुन थोरात तसेच महिला पोलीस अंमलदार रेणुका पठारे व स्वाती बर्डे यांनी केलेली आहे