Wednesday, January 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: punemahangarpalika

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयात लोकशाहीचा महाउत्सव, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. तर काही भावी इच्छुक उमेदवार कोणती आघाडी कशी होते याची वाट पाहत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत वावरत आहेत. परंतु पुणे महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती सुरखा भणगे यांनी सार्वत्रिक निवडणूकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. भावी नगरसेवकांच्या सुविधेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रांगणात भव्य-दिव्य मंडपाची उभारणी केली असून, जसे काय एखाद्या केंद्रीय मंत्र्याच्या वा राजकीय नेत्याच्या मुला-मुलीच्या विवाहाची तयारी आहे की काय असा भास होत आहे. सर्वत्र एखाद्या विवाहासारखी लगबग सुरू आहे. खऱ्या...
पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृतपणे बीडब्ल्युजी संकलन व प्रक्रिया करणाऱ्या खाजगी संस्थांची कामे बंद करण्याच्या आदेशाला आरोग्य निरीक्षकांकडून हरताळ

पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृतपणे बीडब्ल्युजी संकलन व प्रक्रिया करणाऱ्या खाजगी संस्थांची कामे बंद करण्याच्या आदेशाला आरोग्य निरीक्षकांकडून हरताळ

सर्व साधारण
एसआय-डीएसआयची मनमानी, 15 क्षेत्रिय कार्यालय हद्दीतून दरदिवशी प्रत्येकी 100 मे.टन कचऱ्याचा नजराणा, कसा होणार… स्वच्छतेचा पुणे पॅटर्नस यशस्वी… नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत बल्क वेस्ट जनरेटर्स मधील कचरा संकलन व प्रक्रिया करणाऱ्या अनाधिकृत खाजगी संस्थांची पाहणी करून त्यांचे कामकाज तत्काळ बंद करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी 17 नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तथापी 3 डिसेंबर रोजी उपआयुक्त घनकचरा यांच्या आदेशाने काढण्यात आलेल्या आदेशाला पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी हरताळ फासल्याचे समोर आले आहे. आता जो पर्यंत धडक कारवाई होत नाही व जो पर्यंत एसआय-डिएसआय सह मुख्य आरोग्य निरीक्षकांचे अनधिकृत खाजगी संस्था बरोबरचे खाजगी कनेक्शन तोडले जात नाही तो पर्यंत पुणे शहरातील कचऱ्याची समस्या संपणार नसल्याचे चित्र दि...