Wednesday, January 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune crime

पुणे शहर पोलीसांकडील आजच्या गुन्ह्यांचा वृत्तांत

पुणे शहर पोलीसांकडील आजच्या गुन्ह्यांचा वृत्तांत

पोलीस क्राइम
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन 2. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन 3.पर्वती पोलीस स्टेशन 4.विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व 5. येरवडा पोलीस स्टेशन नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबा-9890452092/पुणे शहर वाहतुक पोलीस आता क्वचितच रस्त्यावर दिसून येतात. वाहतुक पोलीसांचा एक वेळ ठरलेली असते, तेवढ्या वेळेत दंडाचा कोटा पूर्ण केला की, नंतर वाहतुक पोलीस कुठेही दिसत नाहीत अशी आज पुणे शहरातील परिस्थिती आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जावून त्यात नागरीकांचा जीव जात आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतही बेदरकार वाहन चालविल्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरीचा मृत्यू झाला आहे. लोणीकाळभोर व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत बेदरकार वाहनांमुळे नागरीकांचा मृत्यू लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील काळभोरवाडा, थेऊर फाटयाजवळ, एक 35 वर्षीय इसमास कुणीतरी अज्ञात...
पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना

पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोप्पे झाले आहे काय… पुणे शहरात पोलीसांचा धाक राहिला आहे की नाही असाच प्रश्न वारंवार उभा राहत आहे. मारणे, कापणे, दगडाने ठेचणे, चाकुने, ब्लेने वार करणे, लोखंडी हत्यारांचा बेमालूम वापर… इतक्या पराकोटीला लोक उतरले आहेत. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेश व कोढवा पोलीस स्टेशन हद्दीतही जुना ताजीराते हिंद तिनसौ दोन म्हणजे आत्ताचा 103 खुनाच्या घटना घडल्या आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशन - पत्नीच्या दागिन्यांची मागणी केल्याने, पतीने पत्नीला ठार मारलेलोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील एक 23 वर्षीय व्यक्तीने फिर्यादी दिली आहे. त्यात आरोपी शैलेंद्र प्रकाश व्हटकर वय 30 वर्ष रा. बकोरी, पुणे हे 22 जानेवारी रोजी सात्रौ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी हायस्कुलच्या पाठीमागे वाडेबोल्हाई यांनी त्यांची पत्नी नम्रता शैलेंद्र व्...
पैशासाठी जिवलग मित्र झाला पक्का वैरी, साथीदाराच्या मदतीने केला मित्राचा गेम

पैशासाठी जिवलग मित्र झाला पक्का वैरी, साथीदाराच्या मदतीने केला मित्राचा गेम

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/दिल,दोस्ती आणि दुनियादारीत पैश्याचा विषय आला की जिवलग मित्र देखील वैऱ्यासारखे वागु लागतात. पैशासाठी एका मित्राचा काटा काढण्यासाठी त्याने दुसऱ्याच साथीदाराला बोलावून घेतले आणि मित्राचाच घात केला. राग आणि पैसा इतका वाईट आहे की, त्याच मित्राला वारजे टेकडी येथील शनि मंदिराजवळ बोलावून त्याच्यावर लोखंडी हत्याराने गळयावर, छातीवर, पोटावर, पायावर, वार करुन व डोक्यात दगड घालुन त्याला जिवे ठार मारले. या घटनेनंतर हद्दीत खळबळ माजल्यानंतर, तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत खुनासारखी गंभीर घटना घडल्याने, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनसह पुणे शहर पोलीस दलाकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेने समांतर तपास केला. यात गुन्हे शाखेने 12 तासाच्या आता गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स...
ई-सिगारेट व तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर विरूद्ध पुण्यात सहा ठिकाणी छापा कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

ई-सिगारेट व तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर विरूद्ध पुण्यात सहा ठिकाणी छापा कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) आणि तवांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. यात लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतून ई सिगारेट तसेच कोथरूड पोलीस स्टेशन व लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतून तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर असा एकुण 8 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून आरोपींना चौकशीकामी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन पुणे शहरात इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करीत असतांना, लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे कलम 7 च 8 प्रमाणे एकुण 03 गुन्हे दाखल करण्यात आले आ...
गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समलैंगिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲपचा गैरवापर करत तरुणांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ॲपवर ओळख वाढवून एकट्या ठिकाणी बोलावणे, धमकावणे, मारहाण करणे आणि एटीएममधून पैसे काढणे असा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे. डेटींग ॲपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे काढुन घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख यांच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोप...
इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/इन्टाग्राम वरून प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन खेडशिवापुर येथे बोलावून, पुढे त्याचे पर्यावासन खुनात झालेल्या व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका विधीसंघर्षित बालिकेस गुन्हे युनिट 3 च्या पथकाने अतिशय शिफाफीने अटक केली आहे. पुणे शहराला हादरवुन सोडणाऱ्या गुन्ह्याचा तपास युनिट 3 च्या पथकाने केला आहे.गुन्ह्याची हकीकत अशी की, 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार अमोल काटकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 103, 137 (2) अन्वये दाखल असले...
शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील जांभुळवाडी रोड, शनिनगर येथील एक 23 वर्षीय युवक एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह स्वामी नारायण मंदिरासमोर, ओंकार लॉज जवळील सर्व्हीस रोडवरील मोकळ्या मैदानात थांबला असतांना, क्राईम युनिट 3 च्या पथकाने शिताफीने जप्त करून त्याला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंगलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता नऱ्हे पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नादेंड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत नवले ब्रिज येथे आले असताना, पोलीस अमंलदार किशोर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम रोहित अनिल संगम, वय 23 वर्ष, रा. जांभुळवाडी रोड, शनिन...
राजकारणी आणि गुन्हेगारांचे पुणे शहरात साटेलोटे, पुण्यात कायदा सुव्यवस्था आणखी शिल्लक आहे काय…?

राजकारणी आणि गुन्हेगारांचे पुणे शहरात साटेलोटे, पुण्यात कायदा सुव्यवस्था आणखी शिल्लक आहे काय…?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिका निवडणूकीत भाजपा, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना आणि काँग्रेस या आलटून पालटून सत्तेत असलेल्या पक्षांचे गुन्हेगारांशी किती व कोणत्या स्तरावर संबंध आहेत, हे पुणेकरांनी मागील 15/20 दिवसात अनुभवले आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्यानंतरही त्याच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. गुन्हेगारांचा एवढा पगडा राजकारण्यांवर असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान तडीपार असलेला एक माजी आमदार स्वतःच्या पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात राजरोसपणे फिरत असल्याची तक्रार एका पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असली तरी, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनसह बहुतांश हद्दीत तडीपार गुन्हेगार, उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले आहेतच, या शिवाय स्लिपा वाटण्याच्या नावाखाली हेच तडीपार गुन्हेगार पैसे वा...
पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात ना...
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी दारूचा महापुर

पोलीस क्राइम
निवडणूक- पुणे महापालिकेची,हातभट्टी - सहकारनगर पोलीसांचीचंगळ आहे, कार्यकर्त्यांची… नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात निवडणूकीचा ज्वर पसरला असुन सर्वत्र लोकशाहीचा महाउत्सव सुरू आहे. गल्लीबोळातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते अंग झटकुन प्रचारात सहभागी झाले आहेत. दरम्यान यात सहकारनगर पोलीसांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश झोपडपट्टयांमध्ये हातभट्टी दारूची खुलेआम विक्री आणि जागेवर बसुन पिण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. कार्यकर्ते कुठून फिरून आले की, एक मग्गा उचलायचा आणि थेट तोंडाला लावायचा… सोबतीला वजडी-पाव आणि तिखट मिठ लावलेला हरभरा… पुणे महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षानंतर होत आहे. मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका झाल्या, परंतु पुणे ...