इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/इन्टाग्राम वरून प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन खेडशिवापुर येथे बोलावून, पुढे त्याचे पर्यावासन खुनात झालेल्या व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका विधीसंघर्षित बालिकेस गुन्हे युनिट 3 च्या पथकाने अतिशय शिफाफीने अटक केली आहे. पुणे शहराला हादरवुन सोडणाऱ्या गुन्ह्याचा तपास युनिट 3 च्या पथकाने केला आहे.गुन्ह्याची हकीकत अशी की, 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार अमोल काटकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 103, 137 (2) अन्वये दाखल असले...


