दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणाऱ्या सराईत आरोपीस पर्वती पोलीसांनी केले जेरबंद
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तुल बाळगणाऱ्या व धनकवडी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या अजित कसबे याला जेरबंद करण्यात पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्यासह तपास पथकाचे किरण पवार व महेश मंडलिक यांना यश आले आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी किरण पवार व पोलीस अंमलदारासह गस्त घालत असतांना, पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे बंदुक जवळ बाळगत आहे.
लागलीच पर्वती पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रमुख किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी अजित सागर कसबे वय 21 वर्ष (रा. स.नं. 15. विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. 504, आंबेगाव पठार धनकवडी पुणे ) यास अत्यंत शिता...
