Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: oung man was robbed in Pune

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समलैंगिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲपचा गैरवापर करत तरुणांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ॲपवर ओळख वाढवून एकट्या ठिकाणी बोलावणे, धमकावणे, मारहाण करणे आणि एटीएममधून पैसे काढणे असा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे. डेटींग ॲपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे काढुन घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख यांच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोप...