Saturday, February 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: inspectors of the sky-sign department

येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

येरवड्यातील जुन्या इमारतीवरील हॉर्डींगच्या सांगड्यामुळे नागरीकांच्या जिविताला धोका, आकाशचिन्ह विभागातील निरीक्षकांच्या बेफिकीरीचा नमूना

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा येथील स.नं. 24 प्रफुल्ल निवास या अतिशय जिर्ण व जुन्या इमारतीवर टार्गेट ॲडव्हरटायझिंग यांचे होर्डींग असून मागील दोन वर्षांपासून त्याचे नुतनीकरण करण्यात आले नाही. जुन्या इमारतींमुळे त्याला परवानगी नाकारण्यात आली असली तरी त्यावरील कपड्याचे बॅनर काढण्यात आले असले तरी हजारो किलोचा लोखंडाचा सांगाडा जागेवरच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे स्थानिक नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला असतांना देखील पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या निरीक्षकांनी कारवाईकडे साफ दुर्लक्ष केले असून त्यांच्या बेफिकीरीचा नमूना समोर आलेला आहे. येरवडा गावठातील प्रफुल्ल निवास या जुन्या इमारतीवरील होर्डींगला परवानगी नाकारल्यामुळे त्यावरील निव्वळ कापड काढण्यात आले असले तरी लोखंडी सांगाडा आहे तसाच ठेवण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी 13 नोव्हेंबर 2023 र...