Saturday, February 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: Hand-distilled liquor

होळीसाठी सणासाठी 6 लाखांची हातभट्टीची दारू, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कारवाई करीत, हातभट्टी लावणाऱ्यांना करायला लावला शिमगा

होळीसाठी सणासाठी 6 लाखांची हातभट्टीची दारू, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कारवाई करीत, हातभट्टी लावणाऱ्यांना करायला लावला शिमगा

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/होळी सण दोन दिवसांवर आलेला असतांना, वाघोली पोलीसांनी हातभट्टी बनविणाऱ्यांच्या अड्डयावर छापा मारून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे मिश्रण जप्त करीत कारवाई केली आहे. होळी सणासाठी हातभट्टी तयार केली जात असल्याचे समोर आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,क्राईम ब्रॅंच युनिट 7 कडील पथक अवैध धंदे विरोधी कारवाईचे अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना, पोलीस अंमलदार नितीन धाडगे व प्रतिक्षा पानसरे यांना माहीती मिळाली की, मौजे भावडी गावचे हद्दीत तांबे यांचे क्रशर प्लांट जवळ एक महीला गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावुन तयार करीत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे गुन्हे शाखा युनिट 7 कडील पथकासह छापा कारवाई केली. भावडी येथे भट्टी राखण करताना आरोपी महीला अनिशा योगेश गुडदावत, वय 20 वर्षे, (रा. 5 नंबर भावडी, हवेली जि. पुणे) मिळुन आल्याने त...