Wednesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: crimepune

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

गे डेटिंग ॲपवर ओळख बनवून पुण्यात तरुणाची लूट, एटीएममधून पैसे काढून दागिनेही हिसकावले

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समलैंगिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲपचा गैरवापर करत तरुणांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ॲपवर ओळख वाढवून एकट्या ठिकाणी बोलावणे, धमकावणे, मारहाण करणे आणि एटीएममधून पैसे काढणे असा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे. डेटींग ॲपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे काढुन घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख यांच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोप...
राजकारणी आणि गुन्हेगारांचे पुणे शहरात साटेलोटे, पुण्यात कायदा सुव्यवस्था आणखी शिल्लक आहे काय…?

राजकारणी आणि गुन्हेगारांचे पुणे शहरात साटेलोटे, पुण्यात कायदा सुव्यवस्था आणखी शिल्लक आहे काय…?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिका निवडणूकीत भाजपा, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना आणि काँग्रेस या आलटून पालटून सत्तेत असलेल्या पक्षांचे गुन्हेगारांशी किती व कोणत्या स्तरावर संबंध आहेत, हे पुणेकरांनी मागील 15/20 दिवसात अनुभवले आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्यानंतरही त्याच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. गुन्हेगारांचा एवढा पगडा राजकारण्यांवर असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान तडीपार असलेला एक माजी आमदार स्वतःच्या पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात राजरोसपणे फिरत असल्याची तक्रार एका पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असली तरी, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनसह बहुतांश हद्दीत तडीपार गुन्हेगार, उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले आहेतच, या शिवाय स्लिपा वाटण्याच्या नावाखाली हेच तडीपार गुन्हेगार पैसे वा...