एकमेकांकडे रागाने पाहिल्याने, धारदार शस्त्रासंह हॉकी स्टीकने कोंढव्यात जबरी मारहाण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोंढवा हे नाव जरी उच्चारले तरी, धारदार शस्त्रे आणि बंदूकांच्या फायरिंगचा आवाज कानाजवळ घुमल्याचा भास होतो. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश भांडण आणि हाणामाऱ्यात धारदार शस्त्रा शिवाय गुन्हा नोंदच होत नाही. आपण घरात कांदा कापण्यासाठी जशी सुरी वापरतो, तसे कोंढव्यात साधी मारामारी करीत असतांना देखील धारदार शस्त्रे आणि बंदूका वापरल्या जात आहेत. पुण्याचा बिहार झालाय म्हणून बोंब मारण्यात काहीच अर्थ नसला तरी, कोंढव्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवायचे हा महत्वाचा मुद्दा आहे.
शुक्रवारी दि. 20 रोजी रात्रौ साडेदहाच्या सुमारास सनं. 42 गल्ली नं. 2 येथे एक 17 वर्षीय फिर्यादी बसले असतांना, फिर्यादी याचा मित्र व आरोपी 1) आसीफ हिदायत शेख, वय- 24 वर्ष (रा. टेम्पल टॉवर बिल्डींगच्या समोर, स.नं. 42 फ्लॅट नं. 302, कोंढवा पुणे व 2) आवेज इलियास शेख, वय5 24 (रा. तिसरा मजला, ...
