Friday, January 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: city engineer

पुणे महापालिका शहर अभियंत्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी प्रत्येकी एक लाख रूपयांचे नियोजन, पण… दुर्देव… शासकीय दुखवटा असल्याने सेवानिवृत्ती कार्यक्रम बारगळा !

पुणे महापालिका शहर अभियंत्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी प्रत्येकी एक लाख रूपयांचे नियोजन, पण… दुर्देव… शासकीय दुखवटा असल्याने सेवानिवृत्ती कार्यक्रम बारगळा !

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे येत्या शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काही अतिउत्साही अभियंत्यांनी, प्रत्येकी एक लाख रुपये वर्गणी काढावी असा सुर आळविण्याचे काम मागील काही दिवसात सुरू होते. दरम्यान हॉल व लॉन बुक झाले, जेवणावळीचा मेनूही ठरला होता. दरम्यान प्रत्येकी एक लाखाचे टारर्गेट काही पूर्ण झाले नव्हते. काहींनी बळजबरीने एक/एक लाख रुपये दिलेही होते. दरम्यान गुरूवार दि. 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मित निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करून, कोणतेही शासकीय कार्यक्रम करण्यास बंदी आदेश जारी झाला. त्यामुळे पुणे महापालिकेतील कित्येक अभियंत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असल्याचे वृत्त आहे. क...