खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून पुणे शहरातील सराईत गुन्हेगारासह ड्रग्ज तस्करांवर कारवाई
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून सराईत गुन्हेगारांसह ड्रग्ज तस्करांविरूद्ध कारवाई केली आहे. यात दरोडा व वाहन चोरी पथ क्र. 1 यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 1 लाख 92 हजार रुपयांचे एम.डी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे, तर खंडणी विरोधी पथक क्र. 1 यांनी एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा-1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा 9 ग्रॅम 63 मिलीग्रॅम एम. डी. (मेफेड्रान) अंमली पदार्थ बाळगणा-या इसमावर कारवाई -
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पि.के.जी.एम शाळेसमोर, गंगाधाम ते अप्पर येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिक...
