विश्रामबागचे पोलीसच हुश्शार ….. विश्रामबाग पोलीसांनी कसब पणाला लावली, सोने चोरास केले जेरबंद
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील एक महिला दि. 2 फेब्रुवारी रोजी आंबेडकर चौक, जकात नाका, वारजे बसस्टॉप ते शनिवारपेठ दरम्यान पीएमपीएलएल बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसमधील गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांच्या उजव्या हातातील 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेल्याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. स्थानिक चोर त्यांच्याच हद्दीत चोरी करणार नाहीत याची पक्की खात्री होती. त्यामुळे हा चोर कुठला बाहेरचाच असू शकतो याची पक्की खुणगाठ विश्रामबागच्या पोलीसांनी लावली आणि त्यानंतर तपासाला गती दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागात चोरी झाल्याने सर्व पोलीस खाडक्न जागे झाले. तसेच सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत प्रभारी प्रदिप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी अंमलद...
