
अखेर त्या 8 उपकामगार अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीच… आयुक्तांचा ठराव विखंडीत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार
पुणे महापालिकेवर 200 पेक्षा जास्त आंदोलने- मोर्चे झाले, 300 पेक्षा अधिक फाईल्स तपासल्या, सार आणि सायबरटेक मध्ये दोषी तरीही दोषमुक्त, साडेतीन वर्षानंतर पुन्हा आगमन… पूर्वी प्रभारी होते आणि आत्ता अधिकृत झाले… पगारी सेवक तरीही एका फाईलवर सहीसाठी लाखाच्या पुढेच बोली…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिअखेर उपकामगार अधिकाऱ्यांची डीपीसी झाली. 19 वेळा प्रयत्न करुनही कोणत्याही आयुक्तांनी सही केली नव्हती. परंतु नवीन आयुक्तांना काही माहिती पडण्याच्या आधीच, त्या 8 सेवकांना उपकामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडतांना, कोणतीही प्रारूप यादी जाहीर करण्यात आली नाही, तसेच संबंधित यादीविरूद्ध हरकती देखील मागविण्यात आल्या नाहीत, असे असतांना देखील पुणे महापालिकेचे अति. आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली आहे.
मागील चार वर्षापूर्वी एकुण 8 सेवकांना पद...