
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील स्वारगेट जवळील लक्ष्मीनारायण चौकात एलडिनेरो या हॉटेलमध्ये तंबाखुयुक्त हुक्का पार्लर सुरू असल्याची तक्रार, स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाल्यानंतर, स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तातडीने बेकायदेशिर हुक्का पार्लरवर कारवाई करून सुमारे 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच हॉटेलच्या वेटरसह मालक, चालक यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
स्वारगेट पोलीस स्टेशन यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून खबर मिळाली की, लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक विकास भारमळ, मपोउपनि सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोअंमलदार टोणपे, पोअंम कुडाळकर, चालक पोअंम ठोंबरे, मार्शल पोअंम जाधव व साळवे यांनी प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा कारवाई करण्यासाठी मोदी प्लाझा बिल्डीग, तिसरा मजला वरील एलडिनेरो हॉटेल येथे गेले असता, सदर हॉटेलचे शटर आतून बंद होते.
हॉटेलचे शटर उघडण्यासाठी बाहेरून वारंवार आवाज देवून देखील हॉटेलचे आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने फायरब्रिगेड जनता अग्नीशमन केंद्र जनता वसाहत पर्वती यांना घटनास्थळी बोलावून त्यांचे स्टाफ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने मोदी प्लाझा एलडिनेरो हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या ग्राहकांकडून रोख रक्कम घेवुन तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरिता कामगारा करवी, आर्थिक फायद्यासाठी व मानवी आरोग्यास धोकादायक /अपायकारक असा अवैधरित्या हुक्का, सेवना करिता हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना विक्री करताना मिळुन आले.
तसेच विविध हुक्का पॉट, चिलीम, वेगवेगळे प्रतिबंधीत तंबाखूजन्य पलेवर व अन्य साहित्य मिळून आले. याबाबत हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार, वय-33 वर्षे, रा गुलटेकडी स्वारगेट पुणे यांच्याकडे विचारणा करता त्याने हॉटेलचे मालक प्रतिक विकास मेहता, रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे यांचे सांगणेवरुन हॉटेलमधील वेटर यांचेकरवी, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले.
त्यानुसार एलडिनेरो हॉटेल, मोदी प्लाझा, स्वारगेट याचे मालक प्रतिक विकास मेहता, हॉटेल मालक सनी सुंदर परिहार व हॉटेलमधील वेटर दिपक सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादुर परिहार यांचेवर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 4-अ, 21- अ. 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून एकूण 22, हजार 560 रुपयांचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र बनसोडे, परिमंडळ दोनचे श्री मिलींद गोहिते, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विकास भारगळ, महिला पोलीस उप निरीक्षक सुजाता जाधव व पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोबरे, जाधव, साळवे यांनी केली.
