Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतून चौकशीच्या फाईल्स गहाळ, लोकायुक्तांकडे दाद मागणार?

PMC-Bandhkam

पुणे/दि/ प्रतिनिधी/

          पुणे महापालिकेच्या उपनगरातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या तक्रार अर्जावरील चौकशीची फाईल्स, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व बांधकाम विभागातून गहाळ झाले आहेत. याबाबत पुणे महापालिका आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी श्री. दयानंद सोनकांबळे यांनी १० जानेवारी २०१९ रोजी बांधकाम विभागाला पाठविलेल्या पत्रातून दिसून आले आहे.

          पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता श्री. रासकर व श्री. बालवे यांच्याकडील विभागातील अनाधिकृत बांधकामे, पार्ट कम्प्लिशन, मान्य बांधकाम आराखड्याव्यतिरिक्त बांधकामे करून भोगवटा प्राप्त करण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे. या सर्व प्रकाराला स्थानिक लोकसेवक व राजकीय पक्षांची पुढारी मंडळींचा मोठा सहभाग आहे. या भागातील बरीच राजकीय पुढारी मंडळी, नगरसेवक बिल्डरांच्या घरातील घरगडी असल्यासारखे मोठ मोठाल्या फाईल्स बगलेत मारून, अभियंत्यांच्या पायर्‍या झिजवित असतानाचे चित्र नेहमीच पुणे महापालिकेत दिसते.           दरम्यान याबाबत रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी केलेल्या तक्रार अर्जावरील चौकशीचे संपूर्ण दस्तएैवज, पुणे महापालिका आयुक्त कार्यालय व  बांधकाम विभागातून गहाळ झाले असल्याचे त्यांचेच पत्रावरून दिसून आले आहे. दरम्यान या विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विलास फड यांची तातडीने झालेली बदली व फाईल्स गहाळ होण्याचा अनन्यो संबंध आढळुन येतो काय याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. दरम्यान चौकशी प्रकरणांवर तातडीने लक्ष न दिल्यास, लोकायुक्त कार्यालयाकडे दाद मागणार असल्याची माहिती रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी दिली आहे.