
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोंढवा हे नाव जरी उच्चारले तरी, धारदार शस्त्रे आणि बंदूकांच्या फायरिंगचा आवाज कानाजवळ घुमल्याचा भास होतो. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश भांडण आणि हाणामाऱ्यात धारदार शस्त्रा शिवाय गुन्हा नोंदच होत नाही. आपण घरात कांदा कापण्यासाठी जशी सुरी वापरतो, तसे कोंढव्यात साधी मारामारी करीत असतांना देखील धारदार शस्त्रे आणि बंदूका वापरल्या जात आहेत. पुण्याचा बिहार झालाय म्हणून बोंब मारण्यात काहीच अर्थ नसला तरी, कोंढव्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण कसे मिळवायचे हा महत्वाचा मुद्दा आहे.
शुक्रवारी दि. 20 रोजी रात्रौ साडेदहाच्या सुमारास सनं. 42 गल्ली नं. 2 येथे एक 17 वर्षीय फिर्यादी बसले असतांना, फिर्यादी याचा मित्र व आरोपी 1) आसीफ हिदायत शेख, वय- 24 वर्ष (रा. टेम्पल टॉवर बिल्डींगच्या समोर, स.नं. 42 फ्लॅट नं. 302, कोंढवा पुणे व 2) आवेज इलियास शेख, वय5 24 (रा. तिसरा मजला, निलेश कॉम्पलेक्स, लेन नं. 5 मीठानगर कोढवा पुणे) व इतर दोन इसमांनी एकमेकांकडे रागा रागाने पाहिल्याचे कारणावरून 17 वर्षीय युवकाला धारदार शस्त्राने त्याच्या डाव्या हातावर व मांडीवर तसेच त्याच्या मित्रास हॉकी स्टीकने पायावर व कमरेवर फटके मारून जबरी जखमी केले आहे.
कोंढवा पोलीसांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी काय आहेत-
कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये आरोपींविरूद्ध भारतीय न्याय संहिता व मपोकाक व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट नुसार गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे करीत आहेत. दरम्यान प्रत्येक गुन्हेगारावर जबरी गुन्हे दाखल केले तरी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात कोंढवा पोलीसांना यश आलेले नाही. याच महत्वाचे कारण म्हणजे पेट्रोलिंग नाही, स्थानिक कार्यकर्त्यांशी सुसंवाद नाही, मुस्लिम मोहल्ला कमिटीच्या बैठकीत पोलीस हजर नसतात, मस्जिद व दर्ग्याच्या विश्वस्तांशी नसलेला सुवांद तसेच एका गटाला जवळ करायचे आणि दुसऱ्या गटाला दूर ठेवायचे अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे कोंढव्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात असल्याचे समोर आले आहे.
