
नॅशनल फोरम/पुणे/दि/ Aniruddha Shalan Chavan/
पुणे महापालिकेचे पैसे झाडाला लागल्यासारखे, ठेकेदारांची कोट्यवधी रूपयांची बीले मंजुर केली जात आहेत. परंतु ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यासह कायम बिगारी सेवक हजर आहेत की नाही याची पाहणी करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तेच काही मोकादम, काही एसआय बोगस हजेऱ्या लिहून पुणे महापालिकेची फसवणूक करीत आहेत. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या व पुणे महापालिका घनकचरा विभागाच्या महापालिका सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार- पवार ह्या आज दि. 23 जुलै 2025 रोजी आरोग्य कोठीवर येवून निव्वळ हजेरी रजिस्टरची पाहणी केली आहे. त्यांनी मागे देखील इतर आरोग्य कोठ्यांतील हजेरी रजिस्टरची पाहणी केली, परंतु हद्दीत फिरून, हद्द स्वच्छ आहे की नाही याची पाहणी केली नाही. निव्वळ आरोग्य कोठ्यांवर हजेरी रजिस्टर पाहून पुणे शहर स्वच्छ होणार नाही, तर हद्दीत पाहणी करून दोषी असलेल्यांवर कारवाई केल्याखेरीज कचऱ्याची समस्या सुटणार नाही.
दरम्यान आज दि. 23 जुलै 2025 रोजी सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील विविध आरोग्य कोठ्यांच्या हद्दीतील कचऱ्याची माहिती घेत असतांना फोटातील दृष्य समोर आली आहेत. जिकडे तिकडे कचराच कचरा पडलेला आहे. तथापी काल दि. 23 जुलै 2025 रोजी धायरेश्वर कोठीतील माहिती दिली असता, तो कचरा नुकताच पडला असल्याचे त्यांनी घनकचरा व्यवस्थापनचे उपआयुक्त संदीपक कदम यांच्या समोरच सांगितले आहे. दरम्यान फेसबुक लाईव्ह करतांनाच मी सदरील कचरा 10 ते 15 दिवसांपासून सडलेला असल्याच सांगितले. परंतु आता पुनः दुसऱ्या हद्दीत जावून पाहणी केली असता, तिथे देखील कचरा उचलला जात नाही.
पुणे महापालिकेच्या आयुक्तांना देखील खोटी माहिती दिली जाते. त्यामुळे पत्रकारांना खोटी माहिती दिली तर त्यात नवल वाटू नये. परंतु अशा वृत्तीमुळे शहर स्वच्छ होणार नाही. आज सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील यु.आर. फॅसिलिटी या झाडणकामाच्या ठेकेदाराकडील बिगारी सेवक काम करीत असतांना असेही निदर्शनास आले की, एकाही सेवकांच्या पायात गमबुट नाहीत, हातात हॅन्डग्लोज नाहीत, मास्क नाहीत, चष्मा नाही, ठेकेदाराच्या नावाचे जॅकेट नाही, ठेकेदाराचा ड्रेस नाही.... जे काही ठेकेदाराचे कर्मचारी काम करतात ते अशा घाणीत कुठल्याही साधन सामुग्रीविना काम करीत आहेत. कचरा भरण्यासाठी टोपली नाही, सगळे कामगार पोत्यावर भरून गाडीत भरत आहेत.
त्यातच मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे त्याच्या एसी मधुन बाहेर पडण्यास तयार नाहीत. उपकामगार अधिकारी देखील त्यांची जागा सोडून बाहेर येत नाहीत. सगळे बसुन पगार घेत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गरीब घाणीत काम करून मरणयातना भोगत आहेत. काही सेवक काम करीत आहेत, काही सेवक कामावर नसतांनाही हजेरी रजिस्टर मध्ये हजर असल्याचे दाखविण्यात येत आहे. आज दि. 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11.40 वाजता व 12.50 वाजता टिपलेले छायाचित्र सोबत प्रमाणे देत आहोत. सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात जाईन तिथे कचराच कचरा... काही मोजकेच सेवक काम करतात, इतर मौजमजा करीत आहेत. अधिकारीही गप्प आहेत, मग पुणे शहर स्वच्छ होणार तरी कसे... उत्तर दया.... ?

ठेकेदाराची सेविका सिंहगड कार्यालयात कशासाठी…
ठेकेदाराकडील एक सेविका सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात सकाळी 11/12 पासून 5 वाजेपर्यंत निव्वळ बसून असते. तिथे कोणताही संगणक नसतो किंवा टेबलवर कुठलेही कागद नसतात. दिवसभर ट्युबलाईट, फॅन सुरू असतो. या महिला सेविकेला सिंहगड कार्यालयात कशासाठी बसवुन ठेवले आहे, ठेकेदाराकडील कर्मचारी आहे, याचा अर्थ झाडणकामासाठी नियुक्ती केली आहे. मग हद्दीत व आरोग्य कोठीवर जावून कामे करण्यापेक्षा सिंहगड कार्यालयात कशासाठी बसवून ठेवले आहे. याबाबत पुणे मनपा घनकचरा कार्यालय, उपआयुक्त परिमंडळ क्र. 3 यांना काहीच माहिती नाही. सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात विचारणा केली तर याबाबत त्यांनाही माहिती नाही. मग ठेकेदाराच्या महिला सेविकेला एवढ्या सुविधा कशासाठी व कुणी दिल्या आहेत. सिंहगड क्षेत्रिय कार्यालय म्हणजे धर्मशाळा वाटली की काय…