Thursday, February 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

ब्रेकअप केल्याचा रागातून ऊस गुऱ्हाळातील हत्याराने मित्रावर वार, धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील थरारक घटना

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
	
	धनकवडीच्या त्रिमुर्ती चौकातील ऊसाच्या गुऱ्हाळातील, ऊस तोडण्याच्या हत्याराने आरोपीवर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा थरारक प्रकार घडला आहे. 2 फेब्रुवारी रोजी फिर्यादी व आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा.  समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे असे संजीवनी बार त्रिमुर्ती चौक, येथे बोलत बसले होते. फिर्यादी यांनी आरोपीस त्याच्या मैत्रिणीपासून ब्रेकअप घडवून, त्यांच्यात भांडण लावून, त्याने कॉल केल्याच्या रागातून आरोपी चेतन चव्हाण याने बाजूच्या ऊसाच्या रसवंती गृहातील ऊस तोडण्याचे हत्यार घेवुन आज तुला जिवंत सोडणार नाही.... असे म्हणून त्या कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हातावर, डोक्यावर, डाव्या पायाचे नडगीस व कानास हत्याराने वार करुन गंभीर जखमी करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

	आरोपी विरूद्ध भारती विदयापीठ स्टेशन येथे भा.न्या सं कलम 109,118(2) आर्म ॲक्ट क 4 (25) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

	दरम्यान फिर्यादीवर वार करून आरोपी चेतन चव्हाण फरार झाला होता. त्याचा शोध घेण्याकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांनी पथके तयार करून रवाना केली. त्याप्रमाणे सपोनि गणेश मोहिते, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गुन्हयातील आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय 24 वर्षे रा फलॅट नं 308 बी विंग समर्थ रेसिडेन्सी धनकवडी पुणे हा वंडरसिटी येथील हायवेच्या सर्व्हीस रोडवर मिळुन आला.  त्यास नमुद गुन्हयात दिनांक 4 फेबु्रवारी रोजी अटक केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास गणेश मोहिते, सहा पोलीस निरीक्षक, हे करित आहेत.


	ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 2. पुणे शहर मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर  धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल कुमार खिलारे भारती विदयापीठ पोलीस स्टेशन यांच्यासह अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली.