Saturday, October 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 मधील रेकॉर्डवरील 18 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी केले तडीपार, अबतक… 150 गुन्हेगारांवर धडक कारवाई

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी तसेच आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने परिमंडळ 5 हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते, म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 56 प्रमाणे 18 सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीतुन 02 वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.
आरोपीचे नावे खालील प्रमाणे आहेत. यात पोलीस स्टेशनचे नाव, गुन्हेगाराचे नाव, केलेले गुन्हे अनुक्रमे नमुद आहेत.

1) काळेपडळ पोलीस स्टेशन- कानिफनाथ शंकर घुले, वय 49 वर्षे, रा. भैरोबा मंदीरजवळ, महंमदवाडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

2) काळेपडळ पोलीस स्टेशन -प्रमिला सर्विन काळकर, वय 41 वर्षे, रा. कृषीनगर, गल्ली नं. 13. महंमदवाडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

3) वानवडी पोलीस स्टेशन – रफीक उर्फ टोपी मेहमुद शेख, वय 55 वर्षे, रा. 302. आशिर्वाद बिल्डींग, 3 रा मजला, पलॅट नं. 304, कोणार्क पुरम सोसायटी, कोंढवा, पुणे (फसवणुक करणे, कट रचणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, धमाकाणे यासारखे एकुण 13 गुन्हे दाखल आहेत.)

4) वानवडी पोलीस स्टेशन – गब्बु उर्फ सनी प्रकाश परदेशी, यय 33 वर्षे, रा. घर नं. 532. नोबेल बेकरीजवळ, वानवडी गांव, पुणे (दुखापत करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे, मारहाण करुन धमकावणे यासारखे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.)

5) कोंढवा पोलीस स्टेशन – मौला उर्फ मौलाना रसुल शेख, वय 22 वर्षे, रा. गल्ली नं. 2. माऊली कृपा बिल्डींग, लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे (दुखापत करणे, मारहाण करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे यासारखे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत.)

6) कोंढवा पोलीस स्टेशन – गणेश तुकाराम घावरे, वय 28 वर्षे, रा. काकडेवस्ती, गल्ली न 1, कोंढवा बुद्रुक, पुणे (जबरी चोरी, दरोडा, जिवे ठार मारणे, तोडफोड करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.)

7)बिबवेवाडी पोलीस स्टेशन- नंदा प्रभु बिनावत, वय 50 वर्षे, रा. पुण्येश्वर मंदिराजवळ, प्रसाद बिबवेनगर, बिबवेवाडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत.)

8) बिबवेवाडी पोलीस स्टेशन- अविनाश / तावु अर्जुन जोगन, वय 27 वर्षे, रा. लेन नं. 16, शेळकेवस्ती, अप्पर बिबवेवाडी, पुणे (दरोडा तयारी करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत.)

9) बिबवेवाडी पोलीस स्टेशन – सारंग बबन गायकवाड, वय 30 वर्ष, रा. जगताप डेअरीसमोर, शिवरायनगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे (गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, धमकावणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

10) लोणी काळमोर पोलीस स्टेशन – उमेश उर्फ टकाभाऊ निवृत्ती राखपसरे, वय 50 वर्षे, रा. बेटरवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, अवैध जुगार चालवणे यासारखे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत.)

11) लोणी काळभोर पोलीस स्टेशन – विनायक अधिकराव लावंड, वय 31 वर्षे, रा. फ्लॅट नं. 506, तारा हाईट्स, संभाजीनगर, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे (जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, खंडणी, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण 04 गुन्हे दाखल आहेत.)

12)लोणी काळभोर पोलीस स्टेशन – शुभम सुदाम विरकर, वय 25 वर्षे, रा. विरकरवस्ती, रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे (बेकायदेशीर जमाव जमवुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे यासारखे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.)

13) हडपसर पोलीस स्टेशन – रोहन सोमनाथ चिचकर, वय 27 वर्षे, रा. स.नं. 3. मिनी कॉम्प्लेक्स शेजारी, लोकसेवा हनुमान मंदिरामागे, गाडीतळ, हडपसर, पुणे (बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करणे, धमकावणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, विनापरवाना औषध विक्रीकरीता जवळ बाळगणे, दुखापत करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

14)हडपसर पोलीस स्टेशन – बापु सुरेश मकवाना, वय 21 वर्षे, रा. स.न. 206, दत्त मंदिराजवळ, गोसावीवस्ती, साडेसतरा नळी, हडपसर, पुणे (गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न)

15) मुंढवा पोलीस स्टेशन – अनिकेत राजेश शेलार, वय 22 वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे (चोरी करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत.)

16) मुंढवा पोलीस स्टेशन -दत्ता गणेश गायकवाड, वय 36 वर्षे, रा. मंगलमुर्ती अपार्ट., जांभळे प्लॉट, केशवनगर, मुंढया, पुणे (चोरी करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, दरोडा तयारी करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

17) मुंढवा पोलीस स्टेशन – दिपक उर्फ कव्या गणेश गायकवाड, यय 38 वर्षे, रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे / जांभळे प्लॉट केशवनगर, मुंढवा, पुणे (चोरी करणे, जबरी चोरी करणे, मारहाण करणे, धमकावणे यासारखे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत.)

18) फुरसुंगी पोलीस स्टेशन – अमोल राजेंद्र तट, वय 45 वर्षे, रा. शेंडे यांचेकडे भाडोत्री, संजय कॉम्पलेक्स समोर, पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे (दुखापत करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण 05 गुन्हे दाखल आहेत.)

उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

माहे जानेवारी 2025 पासुन परिमंडळ 5 कार्यालयाकडुन आज पावेतो 22 सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच 12 मोका कारवाईमध्ये 78 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आजपर्यंत 50 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण 150 सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.

वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. 112 तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. 020-26861214 यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5 पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.