Tuesday, August 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

डेक्कन जिमखान्या पाठीमागील हॉटेल सुकांता, ऋतुगंधसह डीसीसी इन्फोटेक कडून पार्कींगच्या जागेचा व्यवसायासाठी वापर,

हॉटेलमध्ये आलेली सर्व वाहने झेडब्रीजखाली, वाहतुकीची सातत्याने कोंडी
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या डेक्कन जिमखाना अर्थात पुलाची वाडी येथील हॉटेल सुकांता, हॉटेल ऋतुगंध व डीसीसी इन्फोटेक असलेल्या इमारतीमधील पार्कींगच्या जागेवर हॉटेल व इन्फोटेक कंपनीने व्यवसाय थाटला आहे. संपूर्ण पार्कींगचा वापर दुकान व गोडाऊन म्हणून केला जात आहे. तसेच दोन्ही हॉटेल व लॉजिंग मध्ये आलेली वाहने ही झेडब्रीज खाली पार्क केली जात असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतुक पोलीस देखील कारवाई करीत नाहीत. दरम्यान पुणे महापालिकेला दिलेल्या भूंखंडाचा देखील या आस्थापनांकडू वापर केला जात असल्याने स्थानिकांनी याला तीव्र विरोध केला आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम नियमानुसार, खाजगी आस्थापनांमध्ये 1000 स्व्के.फुटाचे हॉटेल किंवा खाजगी आस्थापना असल्यास त्याला किमान 1500 स्व्के.फुटाचे पार्कींग सोडणे बंधनकारक आहे. तथापी पुणे महापालिका बांधकाम नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा भंग केला जात आहे. मुळात या इमारतीत निवासी व व्यापारी संमिश्र स्वरूपाची इमारत आहे. या इमारतीमध्ये हॉटेल ऋतुगंध हॉटेल व लॉजिंग आहे, तसेच हॉटेल सुकांता हॉटेल व लॉजिंग आहे. तसेच याच इमारतीमध्ये डीसीसी इन्फोटेक ह्या संगणक व लॅपटॉपचे होलसेल मार्केट आहे. या तीनही आस्थापनांकडून पार्कींगच्या जागेचा व्यवसायासाठी वापर केला जात आहे. तसेच पुणे महापालिकेस दिलेल्या भूखंडाचा वापर पार्कींग म्हणून केला जात आहे. 

मूळात जागा मालकांनी पुणे महापालिकेस जागा हस्तांरीत केल्यामुळेच या इमारतीचे बांधकामाला जास्तीचा एफएसआय मिळालेला आहे. रस्ता रूंदीसाठी सोडलेल्या जागेचा एफएसआय देण्यात आलेला आहे. त्यामुळेच या इमारतीला बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. आता ती जागा पुणे महापालिकेने ताब्यात घेतली नाही, तसेच रस्ता रूंदीकरणही केलेले नाही. त्यामुळे त्या जागेवर या खाजगी आस्थापना यांची वाहने पार्कींग केली जात आहेत. तसेच या जागेसह झेडब्रीजखाली वाहने पार्क केली जात आहेत. आता डेक्कन जिमखाना येथे मेट्रोचे चढण्याचे व उतरण्याचे (मेट्रोचे लँडीग) ठिकाणही याच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी सातत्याने होत असल्याची स्थानिकांची ओरड आहे. डीसीसी इन्फोटेक यांनी तर संपूर्ण पार्कींगचा वापर दुकान व गोडाऊन म्हणून करीत आहेत. त्यामुळे पुणे महापालिका बांधकाम विभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.