Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दत्तवाडी पोलीस स्टेशनची नस्ती उठाठेव… मॉंसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवरायांची बदनामी करणार्या ब.म. पुरंदरेचा दत्तवाडी पोलीसांकडून सन्मान.

Dattawadi-Police-Pune

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

          पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस स्टेशनने ब.म. पुरंदरे याचा सन्मान करून, राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवराय यांचा उघड उघड अवमान केला आहे. जेम्स लेन या विदेशी लेखकाच्या पुस्तकात राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊ व रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या बद्दल आक्षेपार्ह बदनामीकाकर मजकुर प्रसिद्ध झाल्यानंतर, जेम्स लेनचा कर्ता करविता भांडारकर संस्था व व ब.म. पुरंदरे यांचे नाव पुढे आले. असे असतांना देखील महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये ब.म. पुरंदरे याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला व आता २०१९ मध्ये केंद्र शासनाने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवरायांच्या राज्यातील सुर्याजी पिसाळांच्या औलादी कमी नाहीत आणि त्याच सुर्याजी पिसाळाच्या पिलावळींचा सन्मान करणारे शासनातील अधिकारी असतील तर हे राज्य नेमके कुणाचे असाही प्रश्‍न दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या कुकर्तृत्वावरून दिसून येत आहे.

          ब.म. पुरंदरेंला पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णा इंदलकर तसेच तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, प्रमोद भोसले, सोमनाथ यादव या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी शासनाच्या कर्तव्यावर हजर असतांना, जाणिपूर्वक स्वतःच्या हातातील गुन्हे विषयक कामे बाजूला ठेवून, पुरंदरेचा सन्मान घडवून आणला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकात जो आक्षेपार्ह मजकूर आहे त्याला चुकीची माहिती पुरवणारी पुण्याची भांडारकर प्राच्यविद्या संस्था व पुरंदरेचा मोठा वाटा आहे.

           ‘मी कधीच इतिहास संशोधक नव्हतो, माझा शिवचरित्राशी काडीचाही संबंध नाही’ असे ज्याने न्यायालयात सांगितले आहे. जो मुंबईतील भायखळा या ठिकाणी कोशिंबीर विकायचा तो शिवरायांच्या बदनामीचा मोठा वाटेकरी अर्थात पुरंदरेनामक युरेशिअन ब्राम्हण! त्याच पुरंदरेला आता केंद्र सरकारने ‘पद्मविभूषण’ जाहीर केले आहे. तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता त्याच पुरंदरेचा सन्मान दत्तवाडी पोलीस ठाण्याने केला आहे.

          म्हणजे ज्याने राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊं व छत्रपती शिवरायांचा अवमान केला व करीत आहेत, त्यांचा शासकीय पातळीवर सन्मान करून, त्यांना बदनामीसाठी अधिक प्रोत्साहित केले जात आहे.

पुरस्काराचा अर्थ

          मध्यवर्ती शासनाकडून दिल्या जाणार्‍या भारतरत्नाच्या खालोखाल पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांसाठी काही निकष ठरले आहेत. संगीत, राजकारण, कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय तंत्रज्ञान, समाजसेवा या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या लोकांची या पुरस्कारांसाठी निवड केली जाते. ‘पद्म’ म्हणजे पाय. ज्यांचे पाय सद्गुणांनी भरलेले आहेत. ज्यांच्या कर्तृत्वापुढे आपण नतमस्तक होतो. ज्यांची समाजपूरक अशी भूमिका आहे, त्यांनाच पुरस्कार दिला गेला पाहिजे. परंतु आजपर्यंत सत्तेवर आलेल्या  सरकारने फक्त विशिष्ठ लोकांनाच पुरस्कार देऊन कपाळकरंटेपणा केला आहे.

दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत अनेक पुरस्कार प्राप्त सद्गुणी आहेत

          दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीत जनता वसाहत, पानमळा वसाहत, म्हाडा वसाहत या ठिकाणी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य इथल्या दलित, आदिवासी, अंध, अपंग, परित्यक्त्या महिला, विधवा महिला, मूक बधिर विकलांग यांच्यासाठी अनेक सामाजिक सुधारणेची कामे केलेली आहेत. त्यातील कित्येकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, तसेच शासनातील मोठ मोठे पुरस्कार देवून त्यांच्या कार्यालयाचा उचित सन्मान केला आहे.

          अशा प्रकारच्या सन्माननिय व्यक्तींची यादी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील यादीतील बहुतांश सन्माननिय अतिथी हे दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आहेत. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारप्राप्त सन्माननिय अतिथींचा सत्कार करण्याएैवजी, ज्याने राष्ट्रमाता मॉंसाहेब जिजाऊं, छत्रपती शिवरायांचा अवमान केला, त्यांचा सत्कार करायला घेवारे, इंदलकर व डफळ यांना हा करंटेपणा कसा सुचला,

राष्ट्रपित्याचा सन्मान कधी होणार

           राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशात प्रथम शाळा उघडली व केवळ बहुजनांच्या मुलींना नव्हे तर ब्रह्मवृंदांच्या मुलींनाही शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात तळपताना दिसत आहेत, त्या फुले दाम्पत्याला अद्यापि ‘भारतरत्न’ दिले गेले नाही.

           हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील की, ज्यांनी समाजासाठी आपले रक्त आटवले. परंतु सरकारला त्याची आठवण येणार नाही. कारण आठवण यायला आपले सरकार असावे लागते. आजपर्यंत आलेली सरकारे जातीय मनोवृत्तीची असल्याने त्यांनी विशिष्ठ वर्गालाच  झुकते माप दिले.

          दत्तवाडी पोलीस ठाण्यातील  देविदास घेवारे, कृष्णा इंदलकर तसेच  अनिल डफळ, प्रमोद भोसले, सोमनाथ यादव ही बहुजन समाजातील व छत्रपती शिवरायांच्या राज्यातील कर्तव्यावरील सेवक आहेत. त्यांनी अशा प्रकारे कर्तव्यात कसुरी करणे म्हणजेच छत्रपती शिवरायांचा अवमान मानला जाऊ शकतो.

           दरम्यान पुण्यातून भीम आर्मी या संघटनेच्या वतीने दत्ता पोळ यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर, ब.म. पुरंदरेला पद्मविभूषण पुरस्कार दिल्याबद्दल तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आता दत्तवाडी पोलीस ठाण्याने या केलेल्या कृतीबद्दल दलित व मराठा संघटनांच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्याची मानसिकता सध्या कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे.

कार्यक्षेत्र सांभाळता येत नाही, त्यांच्याकडून शिवरायांची बदनामी करणार्यांचा सन्मान करतात

          दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीतील जनता वसाहत, पानमळा, शाहू वसाहत या ठिकाणी सकाळ असो की संध्याकाळ. दिवस-रात्र हानामारी आणि दगडफेक याशिवाय दुसरे काहीच नसते. जनता वसाहत येथे प्रत्येक गल्लीत सोरट, पत्यांचा क्लब, मटक्यांचे अड्डे, गुडगुडी सारखे जुगाराचे अड्डे दिवस-रात्र खणखणत असतात. आंबेडकर शाळेजवळील अड्डे तर सर्वांनाच परिचित आहेत.

           हातभट्टी सारखे विषारी रसायन तर गल्लीबोळात विक्री केले जाते. चाकु, सत्तुर, छर्‍याची बंदू तर या भागाला नवीन नाहीच. एवढी सर्व गंभिर परिस्थिती दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असतांना, हद्दीतील कायदा व सुव्यवस्था पाळण्याएैवजी नाहक करंटेपणा का सुचावा हा प्रश्‍नच आहे.