उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर; राज्यात पुन्हा नवी समीकरणे?
नांदेड/दि/ वृत्त/उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी तर शिवसेनेकडे युतीचा प्रस्तावही दिला आहे. मात्र, शिवसेनेने या प्रस्तावावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार का? अशी चर्चा सुरू असतानाच आता बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकचा मंचावर येणार असल्याचं वृत्त आहे. हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असून त्यामुळे राज्यात पुन्हा नवी समीकरणं जुळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
येत्या20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिरमध्ये प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलतात ...