Saturday, July 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

राजकीय

आंबेडकरवाद्यांनो सावधान !  ऍड. बाळासाहेब आंबेडकर

आंबेडकरवाद्यांनो सावधान ! ऍड. बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
पुणे/दि/                  ‘आम्ही यापुढे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपाबरोबर जाणार नाही’ असा निर्णय पंढरपूरच्या धनगर मेळाव्यामध्ये धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घेतला. याचे काही कारण आहे आणि त्यामागे एक भूमिका आहे. धनगर समाजातील डोळसपणे राजकारण करणार्‍यांना आता असे जाणवत आहे की, गेली ७० वर्ष धनगर समाजाला या पक्षांनी मतदानासाठी वापरले. पण, समाजाचे प्रश्‍न हे सोडवू शकले नाहीत किंवा ते सोडवण्याची त्यांची इच्छासुद्धा नाही. या कारणामुळेच धनगर आणि आदिवासी यांच्यात नाहक भांडण लावून मतभेद निर्माण केले गेले आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आता या समूहांनी ठरवले आहे की, आम्ही या पुढे सत्तेचे राजकारण करणार, मागणीचे राजकारण करणार नाहीत. सत्तेमध्ये येवून आम्हीच आदिवासींशी चर्चा करून ‘धनगर आणि ...
प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

प्रकाश आंबेडकरांचा मोदी-भाजपवर घणाघात- पेट्रोल दरवाढ रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी

राजकीय
औरंगाबाद/दि/ भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर रिलायन्सची दिवाळखोरी घालवण्यासाठी आणि त्यातून दलाली खाण्यासाठी वाढविल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतक-यांना साले म्हणणारे आणि सालगड्या प्रमाणे वागवणा-या भाजप सरकारने देशात राजेशाही नसल्याचे लक्षात घेण्याचा इशारा आंबेडकरांनी येथील  जंबिंदा मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात दिला.                 प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी प्रमुख असलेल्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्या आघाडीची घोषणा मंगळवारी औरंगाबादमधील जाहीर सभेत करण्यात आली. महाराष्ट्रात या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील असे खासदार ओवेसींनी स्पष्ट केले. &nbs...

तारिक अन्वर यांचे पवारांविरोधात बंड खासदारकीसह राष्ट्रवादी पक्षाचाही राजीनामा

राजकीय
मुंबई/दि/                  सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून २० वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातच बंड केले आहे. राफेल विमान करारासंदर्भात पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत अन्वर यांनी खासदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अन्वर यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या करारात घोटाळा असून त्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.                 शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्तव्य करतान...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघड पैसे खात , तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार : आंबेडकर

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उघड पैसे खात , तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार : आंबेडकर

राजकीय
सोलापूर/दि/ प्रतिनिधी/                  सर्वसामान्यांच्या पैशावर आजवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेनेने डल्ला मारला. फरक इतकाच, की कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उघड पैसे खात होते, तर भाजपकडून कॉर्पोरेट भ्रष्टाचार केला जातोय’’, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापुरात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात केला.                   बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले ,२०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्‍वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मोदी हे सर्वाधिक खोटारडे पंतप्रधान आहेत. पुण्यातील सभेत मोदी यांना चोर म्हटल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, माझ्यावर कितीह...

पवारांनी मोदींना क्लीनचीट दिल्यानंतरही कॉंग्रेसने आघाडी केली तर ती राजकीय अनैतिकता-ऍड. आंबेडकर

राजकीय
सोलापुर/दि/                 शरद पवारांनी राफेल करारात मोदींना क्लीनचीट दिली आहे. पवारांचे हे वक्तव्य कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना खोटे ठरवणारे आहे. यानंतरही कॉंग्रेसने पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली तर ही राजकीय अनैतकिता ठरणार असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकरांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. मोदींचे हात नाही तर त्यांचे तोंड कार्पोरेट भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.                 शरद पवारांनी मोदींना क्लीनचीट देण्याच्या मुद्यावरुन ...

जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच ३ दिवसांचं ‘भागवतपुराण’!, डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची हौस आणि आपले मनोरथ उघड न करता लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याची सवय यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेले ३ दिवस दिल्लीत केलेली भाषणे म्हणजे परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचं उत्तम उदाहरण आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी गांधीभवन इथं पत्रकार परिषदेत केली. वैचारिक दारिद्र्याचं प्रदर्शन                 आगामी २०१९ च्या निवडणुका जवळ येत असून आपल्या कामगिरीमुळे त्या जिंकता येणार नाहीत अशी खात्री वाटल्याने पुन्हा एकदा राम मंदिराचं भूत त्यांनी उभ...

रखवालदारी करणारा चौकीदारच निघाला चोर, राजस्थानमधील सभेत राहूल गांधीची मोदींवर सडकून टीका

राजकीय
डुंगरपुर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य करत राहुल गांधींनी गुरुवारी राजस्थानमधील सभेत नवीन घोषणा दिली. ’गली गली मै शोर है हिंदुस्तान का चौकीदार चोर है’ असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. राजस्थानमधील डुंगरपुर येथील सभेत त्यांनी ही घोषणा दिली. विशेष म्हणजे राहुल यांचे वडिल राजीव गांधीच्या विरोधात बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी ’गली गली मै शोर है राजीव गांधी चोर है’ हीच घोषणा ८०च्या दशकात विरोधकांनी गाजवली होती.                 सभेत बोलताना राहुल यांनी निवडणूकांमध्ये स्त्रीयांनी सक्रीय  सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. भारतात जर बदल घडवायचा असेल तर स्त्रीयांचा सहभाग अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे...
राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राष्ट्रवादीला डिवचणार्या आंबेडकरांची विखे पाटलांनी घेतली भेट, आघाडीत येण्याचे दिले निमंत्रण

राजकीय
मुंबई/दि/ प्रतिनिधी/                 राष्ट्रवादी कॉंग्रेसला डिवचणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आंबेडकरांना भाजपविरोधी आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे.                 विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी आंबेडकर यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. विशेष म्हणजे आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही भेट झाली आहे.                 प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या...

मनुस्मृती आणि चाणक्य निती नुसार देश-राज्याचा कारभार

राजकीय
कुटील आर्य चाणक्यच्या सुत्रानुसार, एखादा देश किंवा प्रदेशावर कब्जा करायचा असेल, तो कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायचा असेल, तर तिथली अर्थव्यवस्था दुबळी करा, लोक अर्थाविना जर्रजर्र झाले पाहिजेत. त्या राज्याच्या चलनाची किंमत शून्य झाली पाहिजे. अर्थाविना, कुणाचाच कुणावर विश्‍वास राहणार नाही. अशी जर्रजर्र अवस्था झाल्यानंतर, तिथली जनता पशुपेक्षाही हीन दर्जापर्यंत पोहोचेल. त्यात युद्ध, अंतर्गत बंडाळी निर्माण करून, तिथल्या राज्यावर आक्रमण करून देश कायम स्वरूपी ताब्यात ठेवता येतो असे आर्य चाणक्याच्या चाणक्यनिती मध्ये नमूद आहे. अगदी तशीच अवस्था आज देश व राज्याची झाली आहे. प्रथम नोटाबंदी करून, देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्याच दोन हजार रुपयांसाठी भिकार्‍यासारखे रस्त्यावर थांबविले. नवीन चलन बाजारात आणले परंतु जागतिक पातळीवर भारतीय रुपयांची किंमत कवडी इतकी देखील राहिली नाही.    ...

जनधन खात्यांतील आकडेवारी जाहीर करा

राजकीय
नवी दिल्ली/दि/  नोटाबंदीच्या काळात नेमकी किती रक्कम जनधन खात्यांमध्ये जमा झाली, याची आकडेवारी जाहीर करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. आर्थिक सर्वसमावेशकतेचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे ऑगस्ट २०१४ मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून गरिबांना तसेच हातावर पोट असणार्या वर्गाला बँकेचे खाते प्रदान करण्यात आले.                 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. याच दरम्यान जनधन योजनेतील खात्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. या निर्णयाचा परिणा...