
पुणे महापालिकेची १५०० कोटींची मोबाईल टॉवर कंपन्यांची थकबाकी,शेकडो कोर्ट प्रकरणांत कोट्यवधी रुपये अडकविले,भ्रष्टाचाराचं पारितोषक म्हणून पदोन्नतीची खिरापत
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेतील कनिष्ठ विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांची विधी समितीमध्ये मुख्य विधी अधिकारी या पदावर नियुक्तीचा ठराव काल मान्य करण्यात आलेला आहे. पुढे हा प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात येणार आहे. तथापी ऍड. निशा चव्हाण यांना पुणे महापालिकेतील व न्यायालयीन कामकाजाचे अपुर्ण ज्ञान, अपुर्ण अनुभव, चुकीची कार्यपद्धती व हेकेखोरपणा यामुळे त्यांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर करू नये अशी मागणी विविध संस्था व संघटनांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कनिष्ठ विधी अधिकारी निशा चव्हाण यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत शंका -ऍड. निशा चव्हाण या पुणे महापालिकेत येण्यापूर्वी मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. तेथे या सहायक कायदा अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. हे पद पुणे महापालिकेतील विधी अधिकारी या पदाच्या समकक्ष नाही. हे पद कनिष्ठ दर्जाचे आहे. त...