
अग्गं बाबोवऽऽऽ…. हडपसर पोलीस स्टेशन समोर लावलेला वाळूचा सहाचाकी डंपर चोरट्याने पळवुन नेला की होऽऽऽ
Hadapsar police
पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वसामान्य नागरीक आणि पोलीस यांचा दुरान्वयाने देखील संबध येत नाही. पोलीस म्हंटल की, भले भले पळ काढतात. नको ती ब्याद म्हणून कल्टी मारतात. आता एखादा सर्वसामान्य नागरीक असो की भुरटा चोर, लुटेरा असो की सरावलेला गुन्हेगार… पोलीस स्टेशन मध्ये आला की सरळ माणसा सारखा वागायला लागतो. पोलीस स्टेशनच्या दारात एखादा पेन पडलेला असेल किंवा एखादी १० रुपयाची कुणाची नोट पडली असेल तर ती उचलतांना देखील १०० वेळा विचार करतो. एवढंच कशाला, कुठं जरी एखादी वडापावाची गाडी, फळाची गाडी लावून थांबल तरी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कामगार आणि त्याच्या मागोमाग पोलीस आलेच म्हणून समजा. पोट भरण्यासाठी देखील अतिक्रमण आणि पोलीस सांभाळावे लागतात. तिथं पोलीसांच्या डोळ्यासमोरच जप्त केलेला ट्रक चोरून घेवून जाणे म्हणजे अरे… देवाऽऽ आजच्या काळात शक्यच नाही. मग हडपसर पोलीस स्टेशन च्या ताब...