
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते; आंबेडकरांचा दावा
पुणे/दि/परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा बाळासाहेब आंबेडकरांना दिला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर चझडउ ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन बाळासाहेब आंबेडकरांनी टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करतो. शेतकरी कृषी बिलवर महाराष्ट्र सरकारने कायदा लागू होऊ देणार नाही असे म्हणतो. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ श...