
१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड
नवी दिल्ली/दि/ देशातील
१२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणात मृत्युदंडापर्यंतची शिक्षा असलेल्या
आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा
देण्याची तरतूद असणार्या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली.
फौजदारी
कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१८ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकावर झालेल्या
चर्चेदरम्यान उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, मागील काही दिवसात
देशात बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर आणि
१६ वर्षांच्या आतील मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
&n...