पवारांनी दुबईतील दाऊदसोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा; बाळासाहेब आंबेडकरांची मागणी
सन 1988 ते 1991, शरद पवार - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भेट … कशासाठी?
नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर छोट्या पक्षांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होतानाही दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांनी दुबईतील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, 1988 ते 1991 साली शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका दौऱ्यासाठी परदेशात गेले होते. शरद पवार भारतातून लंडनला गेले होते आणि तिथून कॅलिफोर्नियाला जाऊन 2 दिवस...