महाराष्ट्रात ओपन- बॅकवर्ड प्रवर्गातील १० लाख शासकीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित, शासनात ३ लाख रिक्त पदे
पुणे महापालिकेतही कालबद्ध पदोन्नतीला खिळ
आरक्षण ततवानुसार पदोन्नती नाहीच.
अधिकारी - कर्मचारी हवालदिल
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
सरकारी
व निमसरकारी कर्मचार्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचे निर्देश सर्वोेेच्च
न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी
मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील
पदोन्नती रखडली आहे. महाराष्ट्रात तर जाणिवपूर्वक आरक्षणाच्या तत्वाची अंमलबजावणी केली
जात नाहीये. दरम्यान राज्यशासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि पुणे महापालिका, जिल्हा
परिषदा यामध्ये देखील खुल्या प्रवर्गानुसार कालबद्ध पदोन्नती देतांना देखील शैक्षणिक पात्रता, आणि ए + सीआर ची अट असल्यान...