
बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?
मुंबई/दि/ प्रतिनिधी/
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा
कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा
सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक
मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे
जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रास्वसंघ
दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय
संघटनेने विरोध केला आहे. याविरोधात...