Tuesday, August 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

अखेर त्या 8 उपकामगार अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीच… आयुक्तांचा ठराव विखंडीत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

पुणे महापालिकेवर 200 पेक्षा जास्त आंदोलने- मोर्चे झाले, 300 पेक्षा अधिक फाईल्स तपासल्या, सार आणि सायबरटेक मध्ये दोषी तरीही दोषमुक्त, साडेतीन वर्षानंतर पुन्हा आगमन… पूर्वी प्रभारी होते आणि आत्ता अधिकृत झाले… पगारी सेवक तरीही एका फाईलवर सहीसाठी लाखाच्या पुढेच बोली…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रति
अखेर उपकामगार अधिकाऱ्यांची डीपीसी झाली. 19 वेळा प्रयत्न करुनही कोणत्याही आयुक्तांनी सही केली नव्हती. परंतु नवीन आयुक्तांना काही माहिती पडण्याच्या आधीच, त्या 8 सेवकांना उपकामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडतांना, कोणतीही प्रारूप यादी जाहीर करण्यात आली नाही, तसेच संबंधित यादीविरूद्ध हरकती देखील मागविण्यात आल्या नाहीत, असे असतांना देखील पुणे महापालिकेचे अति. आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली आहे.

मागील चार वर्षापूर्वी एकुण 8 सेवकांना पदोन्नती देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. तसेच ह्याच सेवकांना पदोन्नती मिळावी यासाठी मंत्रालयातून आर.आर.मध्ये बदल करून आणले होते. तथापी 1. आदर्श गायकवाड अधिक्षक, 2. सुरेश दिघे उप अधिक्षक, 3. बुगप्पा कोळी उप अधिक्षक, 4. अमित चव्हाण टेलिफोन ऑपरेटर, 5. सुमेधा सुपेकर वरीष्ठ लिपीक या सेवकांनी 8 वर्ष प्रभारी उपकामगार अधिकारी म्हणून काम करीत असतांना, पराकोटीचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार केलेला आहे. याबाबत पुणे महापालिकेवर सुमारे 200 च्या आसपास मोर्चे व आंदोलने झाली आहेत. तसेच सार व सायबर टेक मध्ये केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे. तथापी विधी विभागाच्या ॲड.निशा चव्हाण यांनी या सेवकांना कसे वाचविले याबाबत मागील साडेतीन वर्षांपासून आम्ही बाजू मांडत आहोत. तथापी आयुक्तांनी आज अखेर या भ्रष्ट सेवकांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब करून त्यांना आणखी भ्रष्टाचार करण्यास संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या 8 पैकी 5 सेवकांना पदोन्नती दिली आहे. इतर 3 सेवकांची नव्याने निवड केली आहे. दरम्यान या ही निवड बेकायदेशिर स्वरूपाची असून, आयुक्तांचा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाने दाद मागणार असल्याची समोर आली आहे. त्यासाठी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र विधायक स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे समोर आले सादर केली जाणार आहे. पदोन्नतीप्राप्त सेवकांची नावे अशी आहेत. 1. आदर्श गायकवाड – अधिक्षक 2. सुरेश दिघे -उप अधिक्षक 3. पांडुरंग अडसूळ – उप अधीक्षक 4. बुगप्पा कोळी -उप अधिक्षक 5. अमित चव्हाण -टेलिफोन ऑपरेटर 6. निलप्रभा सूर्यवंशी- फार्मासिस्ट 7. माधवी पाटील -वरीष्ठ लिपीक 8. सुमेधा सुपेकर -वरीष्ठ लिपीक अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर आज्ञापत्र प्रसारित केल्यानंतर अवघ्या 48 तासात ते आज्ञापत्र काढुन टाकण्यात आले आहे. याचा नेमका अर्थ काय असू शकतो असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.