Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बुधवार व शुक्रवार पेठा हे तर पुणे शहराचं हार्ट- आगरवाल टोळी ही तर विजापुरच्या आदिलशहापेक्षाही भयंकर

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणं शहर हे मूळातच एक सुंदर शहर आहे. एकापेक्षा एक वेगवेगळे वाडे आणि त्यांची रचना, वेगवेगळी आखिव- रेखिव मंदिर, वेगवेगळे दर्गा आणि मस्जिद, चर्च ह्यांची देखील एक सुंदर रचना आहे. प्रत्येक वाड्यात आखिव- रेखीव सुंदर पाण्याच्या विहीरी आहेत. मुळा मुठा नदीवर एक राजा महाराजांची वेगवेगळी बघण्यासारखी समाधीस्थळ आहेत. रस्त्यांची सुबक रचना. तसेच बाजारपेठांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पुणं शहर भलं मोठ्ठं झालं तरी मंडई, लक्ष्मी रोड वर आल्याशिवाय पुणेकरांचा एक दिवसही जात नाही. निदान सणावाराला तरी पुणेकर ह्या रस्त्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या पुण्याची मुहूर्तमेढ सोन्याचा नांगर फिरवुन, पुनवडीला पुण्यनगरीचं स्थान निर्माण केलं आहे. अशा ह्या पुणे शहरावर मोघलांसह ब्रिटीशांनी देखील आक्रमणे केली, परंतु पुणे शहर हादरलं नाही, घाबरलं नाही. पानशेतच्या प्रलयानंतर २०११ पासून पुण्यातील पेठांवर विजापुरच्या आदिलशहा नामक आगरवाल व त्याच्या टोळीने नगरसेवक, पुढार्‍यांना हाताशी धरुन वाडे विकत व विकसनाच्या नावाखाली घेवून त्यांचा विध्वंस करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही काळापूर्वी विषय हाती घेतल्यांनर सुरूवातीला काहीच वाटले नाही, परंतु आगरवाल टोळीचे दिवसेंदिवस प्रताप पाहिल्यास, त्यातील वाड्यांची आकडेवाडी पाहिल्यास, पुणे शहरावर हा तर स्लो-पॉईजन सारखा शुगर कोटेड सर्जिकल स्ट्राईकचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे वाड्यांचा विकास व वाड्यांच्या दुरूस्तीच्या नावाखाली बांधकामाचा एक प्लॅन मंजुर करून घ्यायचा आणि प्रत्यक्षात जागेवर मनमानी बांधकाम करण्याचे काम, पुणे शहरातील आर्कि. मनिष आगरवाल, बांधकाम व्यावसायिक प्रशांत आगरवाल व ला. इंजि. विक्रम आगरनामक टोळीने सुरू केले आहे. हे तिघेच नाहीत तर ह्यांच्या टोळीत पुणे शहरातील काही नगरसेवक व नगरसेवकांचे भाऊ, मुलं पार्टनर केली असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात ही एक दहशतवादी टोळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नवीन वाडा, नवीन बांधकाम प्रस्ताव व नवीनच बांधकाम कंपनीची स्थापना –
आजपर्यंत पुणे शहरात अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या त्या बांधकाम व्यावसायिकाचा नाव हेच ब्रँड झालं आहे. परंतु मनिष आगरवाल, प्रशांत आगरवाल व विक्रम आगरवाल ह्या बांधकामाच्या दहशतवादी टोळीने पुणे शहरात नवीच फंडा सुरू केला आहे. नव नवीन वाडे विकत घ्यायचे किंवा विकसनाच्या नावाखाली घेण्याचा सपाटा आगरवाल टोळीने सुरू केला आहे. परंतु एकाच बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या नावावर बांधकाम प्रस्ताव मंजुर करून घेण्यात येत नाहीत. तर वेगवेगळ्या कंपन्या, फर्म स्थापन करून, त्यांच्याव्दारा बांधकाम प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी मिळविली जात आहे. नटराज रिऍलिटी, तसेच वेगवेगळ्या नावाने असोसिएटस स्थापन केले असल्याचे पुणे महानगरपालिकेतील रेकॉर्डवरून दिसून येत आहे.
एकादा व्यक्ती वारंवार मोबाईल क्रमांक बदलत असेल तर त्याला नेमकं आपण काय म्हणतो हे सर्वांना ज्ञात आहे. अगदी तस्संच हे प्रकरण आहे. वारंवार वेगवेगळ्या फर्मच्या नावाने बांधकाम प्रस्ताव पुणे महापालिकेत दाखल केले आहेत. परंतु दुसर्‍याच प्रकारचे व मनमानी बांधकाम केले आहे. डीपी आणि डिसी रुलचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कोणत्याही प्रकारचे पार्कींग न सोडता तीन ते पाच मजली इमारतीची बांधकामे दणादण्ण सुरू आहे.
पुणे महापालिका बांधकाम खात्ये…नेमकं काय करते…
पुणे शहरात सर्रास बेकायदा बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी तर पडदे लावुन बांधकामे सुरू आहेत तर काही ठिकाणी बांधकामाचा परवाना घेवून बेकायदा कामे सुरू आहेत. दरम्यान कोणत्याही ठिकाणी पार्कींग सोडली जात नाही. त्यामुळे आज पुणे शहरात पार्कींग ही जागतिक डोकेदुखील ठरत आहे. पार्कींग वरून भांडणे विकोपाला जात आहेत. आमच्या मंगळवार व कसब्यात तर दर तासाला पार्कींगबाबत वाद होत आहेत. पूर्वी सार्वजनिक नळ व विहीरीतील पाण्यावरून भांडणे होत असतं. आता पार्कींग वरून हाणामारी सुरू आहे.
अशा प्रकारचा विध्वंस सुरू असतांना पुणे महापालिकेतील बांधकाम खाते नेमकं काय करतय हा प्रश्‍न साहजिकच पडला असेल. ह्याबाबतचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध केलं आहे. तथापी अधिकारी व कर्मचारी आगरवाल नामक दहशतवादी टोळीत सहभागी झाल्याने ह्या प्रकारावर काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे. बेकायदा बांधकामे व बेकायदा कृत्यांमुळे पोलीस व नागरीक, पोलीस व स्थानिक व्यावसायिक यांच्यामध्ये वाद वाढत आहेत. सख्ये शेजारी शेजारी आज पार्कींगमुळे एक मेकांच शत्रु झाले आहेत. त्यातच आता वाड्यांमध्ये चार चाकी वाहनांच फॅड आल्यामुळे…. आम्ही फोर व्हिलर घेतल्यामुळेच ह्यांच्या पोटात दुखतय असा कांगावा देखील वाड्या वाड्यात सध्या घुमत चाललाय.. परंतु खरी हकीकत अशी आहे की, पुणेकरांचा विकास झाल्यास दुसर्‍याला बरेच वाटणार आहे, परंतु पार्कींग ही खरी समस्या आहे हेच कुणी समजुन घ्यायला तयार नाही.
विजापुरच्या आदिलशहा नामक आगरवाल दहशतवादी टोळीने हा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेने आगरवाल टोळीतील ज्या सदस्यांना ला. आर्कि. ला. इंजिनिअर म्हणून नोंदणी केली आहे ती तातडीने रद्द करण्यात यावी….. तसेच ज्या ठिकाणी मान्य लेआऊट व्यतिरिक्त बांधकामे केली आहेत, ती दंड भरून नियमान्वित करण्यापेक्षा कटर लावुन ती पाडून टाकण्यात यावीत….सद्य स्थितीतील बांधकामे मान्य लेआऊट व्यतिरिक्त सुरू असल्यास ती तातडीने बंद पाडावीत, संबंधित टोळीचा नवीन बाधंकाम प्रस्ताव मान्य करू नये… ह्या सारखी कडक उपाययोजना केल्याशिवाय पुणे शहराचे हार्ट स्वस्थ राहणार नाही यात शंकाच नाही…
जयंत सरोदे यांच्याकडून खरपुस समाचार –
बांधकाम विभागात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी श्री. जयंत सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता, बांधकामात झालेल्या ह्या अनियमिततेबाबत कनिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात येईल. शिवाय दोषी असलेल्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे श्री. सरवदे यांनी सांगितले आहे. दरम्यान एका व्यक्तिचा अर्ज ह्या विषयावर अर्ज सादर केल्यानंतर पुन्हा याच विषयानुषंगाने पुन्हा तीन ते चार जणांकडून याच विषयावर तक्रार अर्ज येत आहेत. एका विषयासाठी अर्ज सादर केल्यानंतर पुन्हा त्याच विषयावर अर्ज येत असल्याने बांधकाम विभागात आश्यर्च व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकारामागे आगरवाल टोळीचे काही सदस्य आहेत किंवा कसे ह्याची देखील तपासणी करण्यात येत आहे.