Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

… तर विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार – बाळासाहेब आंबेडकर

prakash amedkar

मुंबई/दि/  विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत,  तर  निवडणुकांवर  बहिष्कार टाकणार,  अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनी बोलताना  घेतली आहे.  तसेच ईव्हीएममुळेच वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला, असा दावा त्यांनी यावेळी केला. 

     याबाबत बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,  हे सरकार, निवडणूक आयोग ईव्हीएम वापरण्यात इंटरेस्टेड असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेतच भाग घेऊ नये. बॅलेट येणार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सहभागी होऊ,  ही भूमिका महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी.

     बॅलेट आलेच पाहिजे यावर मी ठाम आहे आणि नाही आले, तर विधानसभा नाही लढणार. आता माझे हे मत आमच्या पक्षात कॅरी होईल का हे मी आता ठामपणे सांगू शकत नाही. पण मी कॅरी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.