Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नाना पेठेत कोयता-पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत माजविणाऱ्यांची,समर्थ व क्राईम ब्रँचच्या पोलीसांच्या समांतर तपासाचा पुणेरी हिस्का… समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांची दिमाखदार कामगिरी

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
आमदार, खासदार किंवा नगरसेवकाने वा राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पाठीवर शाब्बासकीची थाप मारल्यानंतर, गल्लीबोळातील नवशिक्या दादा आणि भाईंना पोलीस आणि कायदयाचा धाक नेमका काय असतो याचे भान राहिलेले नसते. त्यामुळे हम करे सो कायदा असे त्यांचे वर्तन सुरू असते. थर्ड फर्स्ट च्या मध्यरात्रौ आणि नववर्षाच्या पहाटेच आपसात झालेल्या भांडणाचा राग मनाशी धरून काही नेत्यांच्या लाडक्यांनी पुण्यातील नाना पेठेत कोयता, पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन, दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु समर्थचे प्रसाद लोणारे-सौरभ माने व क्राईम ब्रँचचे निलेश साबळे-अजय थोरात यांनी कायदा मोडणाऱ्यांना जेरबंद केले असून, पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना पुणेरी हिसका दाखविण्यात आला आहे. पळुन गेला तरी कानुन के हाथ बहोत लंबे होते है हा साक्षात्कार नाना आणि भवानी पेठेतील दादा-भाईंसंह आता सर्वांनाच झाला असेल यात शंकाच नाही.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार समर्थ पोलीस स्टेशचे सर्व अधिकारी कर्मचारी थर्टीफर्स्टच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. गुन्हेगार चेक करीत होते. परंतु नववर्षाच्या पहाटेच आपआपसात झालेल्या भांडणाचा राग मनाशी धरून काही सराईत गुन्हेगारांनी पुण्यातील नाना पेठेतील नवावाडा येथे हातात कोयता, पालघन सारखी हत्यारे हवेत फिरवुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हातात हत्यारे घेवून दहशत माजविण्याची बाब लक्षात येताच, समर्थ पोलीस स्टेशन कडील सपोनि प्रसाद लोणारे व पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने हे तत्काळ घटनास्थळी दाखल होवून तांत्रिक विश्लेषणाव्दारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. यात 1. गगन मिशन 2. अमन खान 3. अरसलन तांबोळी 4. मंगेश चव्हाण व 5. गणेश पवार यांना अटक केली परंतु इतर सराईत मात्र पळुन जाण्यात यशस्वी झाले होते. 
दरम्यान गुन्हे युनिट एकने सतर्क राहून, समांतर तपास सुरू केला. यात पाहिजे आरोपी असलेले 1. मयुर थोरात 2. सुजल टापरे व त्यांचा एक साथीदार अटक चुकविण्यासाठी नारायण पेठेतील आेंकारेश्वर मंदिराच्या मागील नदीपात्रातील धोबी घाटालगत लपुन बसले असल्याची खबर युनिट एकचे श्री. निलेश साबळे व श्री. अजय थोरात यांना मिळाली. 

त्यानुसार श्री. निलेश साबळे व श्री. अजय थोरात यांनी सिंघमस्टाईल एन्ट्री करून, लपुन बसलेल्या 1. मयुर दत्तात्रय थोरात वय 23 वर्ष 2. सुजल राजेश टापरे वय 19 दोघे रा. डोके तालिक मागे नाना पेठ यांच्यासह एक विधीसंघर्षित बालक यास पालघन, कोयता व सुऱ्यांसह ताब्यात घेवून त्यांच्याकडून 2200 रुपये किंमतीची हत्यारे जप्त करण्यात आली. 

संबंधितांविरूद्ध समर्थ पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 143, 147, 148, 149, 504, 506 (2) व आर्म ॲक्ट 4 (25) तसेच मपोॲक्ट 37 (1) (3) 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. समर्थ पोलीस स्टेशन कडून सपोनि प्रसाद लोणारे, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहितदास वाघीरे, सुभाष पिंगळे, रहिम शेख, कल्याण बोराडे व श्याम सुर्यवंशी यांनी तपास केला तर गुन्हे युनिट एक कडून पोलीस अंमलदार निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, महिला पोलस अंमलदार रूक्साना नदाफ यांनी तपास केला आहे.