पुणे/दि/ नॅशनल फोरम/
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रेड लाईट एरियात दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. नेमक्या चोऱ्या कोण करीत आहे याबाबत चौकशी करण्यात येत होती.दरम्यान रेड लाईट एरियात वेश्यागनासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने टार्गेट करून चोरी करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्य यांनी ज्या ठिकाणाहून अधिक मोटारसायकल चोरी झालेल्या, त्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्यानंतर पोलीसांची चक्रे फिरली आणि आरोपी पोलीसांच्या जाळ्यात अडकला. शब्बीर सय्यद यांनी दमदार कारवाई करून खऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.
दरम्यान दुचाकी वाहन चोरीच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस अंमलदार ना वैभव स्वामी व पो.ना प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासुन ते देहू रोड पर्यत दुचाकी मोटारसायकलचा शासकीय व खाजगी असे मिळुन आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल 150 ते 200 सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, त्यांना भक्ती शक्ती चौका पर्यत मोटारसायकल चोराचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करून माग काढला, परंतु तेथुन पुढे आरोपी कोठे गेला ? याबाबत काहीएक माहीती मिळत नव्हती.
तथापी सराईत चोर आरोपी रात्रीच्या वेळी मोटारसायकल चोरी करुन जात असल्याचे लक्षात आले होते. तपास पथकाचे पोलीस अंमलदार पो.ना वैभव स्वामी, पो.ना प्रविण पासलकर, पो.शि सुमित खुट्टे बुधवार पेठ, भागात पेट्रोलींग करत असताना सी.सी.टी.व्ही फुटेज मधील मोटारसायकल चोरणा-या इसमाप्रमाणे एक संशयीत इसम, दाणे आळी बुधवार पेठ, पुणे दिसुन आला असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेतले. त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता सोहेल युनुस शेख, वय-26 वर्षे व्यवसाय मजुरी. रा. पारसी चाळ, देहू रोड रेल्वे स्टेशन जवळ, थापा गॅरेजच्या पाठीमागे, देहु रोड, ता. मावळ, जि.पुणे असे असल्याचे सांगितले.
तेव्हा त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी करता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीबाबत अधिक माहीती घेता, मोटारसायकल चोरीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन पुणे येथे गु. रजि.नं 135 / 2022 भा.दं.वि. कलम 372 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. त्यास सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे अधिकारी श्री संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास पथकाचे सहाय्याने अधिक तपास करता त्याच्याकडुन चोरीच्या 4,40,000/- रुपये किंमतीच्या 16 मोटारसायकल जप्त केल्या असुन 17 गुन्हे उघडकीस आले आहे.
दुचाकी वाहन चोरीचा तपास कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- 1 पुणे श्रीमती प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर समीर माळवदकर किशारे शिंदे, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.