Saturday, November 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट 1 ची धडक कारवाई,

मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले जेरबंद
2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 1 येथील पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे प्लॅटीनम बिल्डींग मंगळवार पेठ , समोरील रोडवर पुणे येथे सापळा लावून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असताना संशयीत आरोपी नामे 1 ) अशोककुमार दिनेश महातु वय 35 वर्ष रा फुलकाहा वॉर्ड नं 11 , ता कन्होळी , जि . सितामाली , राज्य बिहार , 2 ) आझादकुमार रमेशकुमार महातु वय 25 वर्ष रा मु पो ममलखा , ता घोघा जि भागलपुर , राज्य बिहार . 3 ) विजय गगनदेव महातु वय 2 9 वर्ष रा घर नं 3 9 / 40 , गांधीनगर , गल्ली नं . 13. शांतीमोहल्ला , जुनी दिल्ली , 4 ) अबोधकुमार चलीतर महातु वय 1 9 वर्ष रा रघुनाथपुर बरारी , श्रीनगर छरापट्टी , बेगुसराय , राज्य बिहार , 5 ) चंदनकुमार फेनतुस महातु वय 22 वर्ष रा मुकबिरा चायटोला , जि मुगेर राज्य बिहार , 6 ) अनिवाशकुमार घिरेनदर रवि वय 22 वर्ष रा विष्णुपुर आधार , जि सितामडी , राज्य बिहार , 7 ) सुरेशकुमार नथुनी महातु वय 20 वर्ष रा ऊत्तमनगर , नंदरामपाल , गल्ली नं . 6. नवी दिल्ली यांना पकडण्यात आले होते .


त्यावेळी त्यांच्याकडून आठ विविध कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट , कोयते चाकु , सत्तुर , मिरची पुड , नायलॉन दोरी असा एकुण 94,780 / – रू असा माल मिळुन आला आहे . त्यांच्या विरुध्द समर्थ पोलीस ठाणेत गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.
नमुद आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेवुन त्यांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी संगनमत करुन दिल्ली हैद्राबाद पुणे मुंबई – गुजरात असे रेल्वे प्रवासादरम्यान चोरलेले किंमत रु. 1,07,000/- रु . चे एकुण 20 विविध कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे . जप्त मोबाईल पैकी दोन मोबाईल पुणे शहर हद्दीतुन चोरले असल्याचे निष्पन्न झाले असुन 2 गुन्हे उघडकीस आले आहे . सदरचे अटक आरोपी यांची रेल्वे प्रवासादरम्यान तसेच गर्दीचे ठिकाणी मोबाईल चोरीचे गुन्हे करणारी आंतरराज्यीय टोळी आहे . तसेच सदर आरोपींनी पुणे जिल्हयासह हैद्राबाद , गुजरात , मुंबई , दिल्ली मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्या अनुषंगाने आरोपीकडे तपास सुरु आहे . यातील आरोपी विजय गगनदेव महातु व अशोक कुमार महातु यांचे विरुध्द दिल्ली व सिकंदराबात येथील पोलीस ठाणेत मोबाईल चोरी व जबरी चोरीचे असे 8 गुन्हे दाखल आहेत.


ही कारवाई युनिट एक कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सपोनि आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.