Saturday, November 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

साळुंके विहार परीसरात स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; 5 आरोपींविरुद्ध कारवाई, 4 पिडीत महीलांची सुटका.

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मध्यवर्ती पुणे शहरात रेड लाईट एरिया असल्याने त्या भागाला कायम कानफाटे हे नाव ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू असतांना, त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी कायदा-सुव्यवस्था, सामजिक बांधिलकी, कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार, दि. 3/8/22 रोजी वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार या उच्चभ्रू परीसरातील ‘गोल्डन टच स्पा’, डी 101/102, गिरमे हाईट्स, साळुंखे विहार रोड, वानवडी, पुणे येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय छापा टाकुन 5 आरोपींविरुद्ध कारवाई व 4 पिडीत महीलांची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान सामाजिक सुरक्षा विभाग यांना वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या स्पा सेंटरची गोपनिय माहिती मिळाल्याने, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी पंचासमक्ष जावून, डमी कस्टमरसह, सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली असता, तेथील पीडीत मुलींकडून मसाजसह शरीर संभोगाचे एक्स्ट्रा सर्व्हिसचे नावाखाली, ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन, वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे खात्रीपुर्वक निदर्शनास आले. 

त्यावरुन सदर ठिकाणी पंचनामा करून, सदर स्पा चे काऊंटर वरील 2 मॅनेजर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात एक महिला आरोपी असून सदर महीला परराज्यातील आहे. सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहीती पुढीलप्रमाणे आहे.

1) मॅनेजर – झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल, वय 27 वर्षे, धंदा – स्पा मॅनेजर, रा.ठी. – ज्योती हॉटेलजवळ, कोंढवा, पुणे, मूळ राहणार – पश्चिम बंगाल.
2) मॅनेजर – सुमित अनिल होनखंडे, वय – 21 वर्षे, धंदा – स्पा मॅनेजर, रा.ठी.शिवनेरी नगर, गल्ली नंबर 27, कोंढवा खुर्द, पुणे.

सदर गुन्ह्यातील पाहीजे आरोपींची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
3) स्पा मालक – श्रीमती रचना संतोष साळुंखे उर्फ रचना डोंगरे उर्फ रचना नवगिरे, धंदा – स्पा चालक व मालक, रा.ठी. फ्लॅट नंबर 1, पहिला मजला, केदारेश्वर हाईट सोसायटी, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, पुणे.
4) लोचन अनंता गीरमे, धंदा – स्पा सहकारी तथा स्पा मालक, रा.ठी. वानवडी, पुणे (पूर्ण पत्ता माहीत नाही).
5) सार्थक लोचन गिरमे, धंदा – स्पा मालक, रा. – वानवडी (पूर्ण पत्ता माहित नाही)

वरील नमूद पाहिजे आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर स्पा मध्ये मालीश व स्पा बरोबरच लोकांना एक्स्ट्रा सर्व्हिसेस या गोंडस नावाखाली स्थानिक व परराज्यातील तरुणीकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.
सदर छापा कारवाईत एकुण 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यात एक छत्तीसगड राज्यातील व एक पश्चिम बंगाल राज्यातील आहे.
सदर गुन्ह्यात रोख रकमेसह एकूण . 17,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणातील उपरोक्त नमूद आरोपींविरुद्ध वानवडी पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 308/22, कलम 370, 34 भा.दं.वि. सह पिटा कायदा कलम 3, 4, 5,7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची छापा कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक, म.पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, मपोहवा नीलम शिंदे, मपोहवा राजश्री मोहीते, पो हवा अजय राणे, पोना इरफान पठाण,  पोना हणमंत कांबळे, पोना सुरेंद्र साबळे, पोशि साईनाथ पाटील, पोशि अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.