Thursday, February 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

मार्केटयार्ड, बिबवेवाडी व आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 9 गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

मार्केटयार्ड झोपडपट्टीतून सोमगौडा चौधरी तर प्रेमनगर मधुन साहिल अष्टगे, बिबवेवाडीतून मोरे, ठाकर, सणस, डोंगळे तर आंबेगाव शनिनगरातील आकाश कांबळे व स्मशानभुमीजवळील आर्यन बेलदरे तडीपार
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 02 मधील पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील बेकायदेशीर हत्यार वापरणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, दंगा करणे, हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, इतरांचे जीवन धोक्यात आणणारी कृती करणे, दहशत माजवणे, जबरी चोरी करणे, दुखापतसह जबरी चोरी करणे, बलत्कार करणे, जातीवाचक भाष्य करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर अतिक्रमण करणे, गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, चोरीचा माल जवळ बाळगणे, बेकायदेशीर अंगली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे, स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, घरफोडी करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या बिबवेवाडी, मार्केटयार्ड व आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे 9 गुन्हेगारांना 2 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस परिमंडळ दोनचे उपआयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले आहेत. खालील प्रमाणे पोलीस स्टेशन निहाय आरोपींची नावे-

बिबवेवाडी पो स्टे कडील आरोपी नामे-
1) जालिंदर मसा मोरे, वय 48 वर्षे, (रा. 39/14 276 ओटा अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे)
2) अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर, वय 26 वर्षे, (रा. खोली नं 25 बी 64, सुवर्णयुग मित्रमंडळाजवळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे)
3) ओंकार लक्ष्मण सणस, वय 23 वर्षे (रा. हनुमान चाळ राजीवगांधीनगर, बिबवेवाडी पुणे)
4) राजु महादेव डेंगळे, वय-22 वर्षे, (रा. गोकुळनगर, सुखसागर नगर, पुणे )

आंबेगाव पो स्टे कडील आरोपी नामे-
1) आकाश गुलाबराव कांबळे वय 21 वर्षे (रा. सध्या दोरीवाल्यांची चाळ, गल्ली न 01. शनिनगर, जांभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द पुणे. मुळगाव गणपती मंदिराजवळ, चुना पेगाव शेड लक्ष्मीनगर, परभणी)
2) कृष्णा बबन लोखंडे वय 24 वर्षे (रा दत्तमंदिराच्या समोर, जवारलाल बेकरी शेजारी, शनिनगर, आंबेगाव बु॥, जांभुळवाडी रोड पुणे)
3) आर्यन बापु बेलदरे वय 24 वर्षे (रा. आई श्री व्हीला प्लॅट नं 304 स्मशानभुमी जवळ आंबेगाव बु॥ पुणे )

मार्केटयार्ड पो स्टे कडील
1) सोमगौडा गुरन्ना चौधरी, वय 33 वर्षे, (रा. रा नं 570 गल्ली नं 02 आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे)
2) साहिल भिमा अष्टगे वय 20 वर्षे (रा. स नं 692 विश्वरत्न बुध्दविहार चौक प्रेमनगर वसाहत मार्केटयार्ड पुणे)

अशा एकुण 9 गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर, पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार आदेश केलेले आहे.
ही कारवाई श्री. अमितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर,  श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त प.प्रा.वि.पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त परिमंडळ 02 पुणे हद्दीतील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे.