Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वारजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

पुणे/दि/ वृत्तमिमांसा/
छुमक छूम नाचे, नाचेनर्तकी, शृंगारातून आले न्हाऊन, स्वर्गातल्या मेनकेसारखी. अशा प्रकारच्या रंभा, मेनका आणि उर्वशींचा संपूर्ण पुणे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली धुमाकूळ सुरू आहे. जिथं- तिथं मसाज पार्लर. सगळीकडे वेश्याव्यवसायाचे पेव फुटले आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. भितीमुळं नागरीक घराबाहेर यायला घाबरत आहेत. परंतु शौकीन मंडळी मात्र कोरोना संकटातही छैलाबाबू म्हणून मिरवित आहेत. आणि या शौकीन छैलाबाबूंसाठी जिस्मके सौदागर पुढे आले आहेत. पुणे शहरात एकही पोलीस स्टेशन असे नसेल की जिथं मसाज पार्लर नाही. सगळीकडे मसाज पार्लर सुरू आहेत. शंभरातून केवळ एक दोघांवर कारवाई होते. कायदयाच्या कच्च्या कलमातून अटक आणि सुटका केली जात आहे. त्यामुळे पुणे शहरात सध्या जिस्मके सौदागरांचा विळखा पडला आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग ह्या गुन्हेशाखेकडील यंत्रणेकडून महिलांच्या अपव्यापाराबाबत कारवाई केली जात आहे. वारज्यात वेश्यव्यवाय सुरू असल्याची माहिती याच खात्यातील संतोष भांडवलकर या पोलीस कर्मचार्‍याला मिळाली. संतोष भांडवलकर यांनी वरीष्ठ पोलीसांचे मार्गदर्शन घेवून, वारजे पोलीस स्टेशन हद्दीतील साई एक्झीकेटीव्ह लॉज, पुणे बेंगलोर हायवे येथे अचानक छापा टाकुन तेथील ३ मुलींची सुटका केली तर जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे वय ३२, रा. श्रद्धा कॉलनी काळेवाडी पुणे व राम व्यंकट जाधव जनता वसाहत पर्वती पायथा तसेच एक महिला यांना अटक करून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमातील कलम ४, ५, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता, हा जबरी गुन्हा असून, जिस्मके सौदागरांवर याच कायदयात आणखी कडक कलमे आहेत. परंतु केवळ जामिनावर तत्काळ सुटका होणारे गुन्हे दाखल करून, नेमकं सामाजिक सुरक्षा विभागाला काय दाखवायचे आहे हा मला तर वर्षानुवर्षे प्रश्‍नच पडला आहे. या कारवाईत पोना माने, मपोना अश्‍विनी केकाण, पोना हनुमंत कांबळे, पो. कॉ. संतोष भांडवलकर व संदीप कोळगी यांनी केली आहे. कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेणं आणि दुसर्‍या बाजूने कच्ची कलम लावून, त्यांना १२ तासाच्या आत बाहेर काढणं असली कारवाई नेमकी काय कामाची हे आता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नूतन पोलीस आयुक्तांनीच ह्या विभागाला विचारणे सोईचे होईल.