Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

येरवडा आणि येरवड्याचे रेशनिंग कार्यालय म्हणजे वरून किर्तन आणि आतुन तमाशा

येरवडा रेशनिंग शिधापत्रिका कार्यालय

पुणे/दि/ प्रतिनिधी/
येरवडा आणि येरवड्याचं रेशनिंग अर्थात शिधापत्रिका कार्यालय म्हणजे तु रडल्यासारखं कर आणि मी मारल्यासारखं करतो अशी त्याची अवस्थ आहे. एजंटा खेरीज या कार्यालयात भल्या भल्यांचे कामच होत नाही. जिल्हाधिकारी पुणे साध्या गणवेशात गेले तरी त्यांचे देखील एजंटाशिवाय कामच होणार नाही, कागदात पकडायचे म्हटले तरी अधिकारी सहीसलामत बाहेर पडतात. त्यामुळे रेशनिंग कार्डाचे एवढे घोटाळे होवून देखील एकही अधिकारी किंवा कर्मचारी एकदाही निलंबित झालेला नाही. ह्याला म्हणायचे महसुली कारभार…


महा ई सेवा केंद्र, एजंट आणि रेशनिंग अधिकारी यांच ट्युनिंग इतक जुळलं आहे की, त्यांची एकमेकांची साखळी आहे. आणि एखादयावेळस हे बिंग फुटलच तर एकमेकांवर तुफानी चिखलफेक करून स्वतःला वाचविणे एवढेच काम एजंट आणि रेशनिंग अधिकार्‍यांचं असतं.
येरवडा रेशनिंग कार्यालयाचे प्रमुख प्रशांत खताळ वय ३२ वर्षे रा. क्वीन्स गार्डन यांनी फिर्याद दिली आहे की, प्रशांत खताळ हे येरवडा रेशनिंग कार्यालयाचे परिमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोन आरोपीपैकी (आरोपी अटक नाही) आरोपी नं. १ याने येरवडा येथील रेशनिंग कार्यालयात येवून अन्नधान्यविषयी चौकशी करून, त्यांचे नावाने असलेले केशरी शिधापत्रिका नंबर एस.के. ३२४५८३ हे बनावट सही शिक्का शिधापत्रिका हे त्याने आरोपी नं. २ याच्या मदतीने तयार करून त्याचा उपभोग घेवून ते परिमंडळ अधिकारी यांच्या समक्ष करून शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली आहे.


खरं तर येरवडा रेशिनिंग कार्यालयात प्रशांत खताळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून पूर्वीपेक्षा अधिक भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे नागरीकांचे मत आहे. एजंटाशिवाय कामच होत नाही. एजंटाखेरीज काम केले तर ती शिधापत्रिका बोगस व बनावट असल्याचे सांगुन ओळखीच्या नसलेल्या एजंटावर व शिधापत्रिका धारकांवर गुन्हा दाखल केला जातो अशीच वार्ता संपूर्ण येरवड्यात आहे. त्यामुळे परिमंडळ अधिकारी श्री. प्रशांत खताळ हे स्वतः तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या एजंटाकडेच सर्व शिधापत्रिका, पिवळी शिधापत्रिका, तसेच पिवळ्या शिधापत्रिकेनुसार देण्यात येणारी आरोग्य सुविधा मिळतात. मात्र श्री. खताळ यांच्या एजंटा खेरीज दुसर्‍या एजंटाकडून कामे करवून घेतल्यास गुन्हा दाखल होण्याची वेळ येते त्याचा हा अव्वन नमूना असल्याचे नागरीकांचे मत आहे. स्वतः जिल्हाधिकारी पुणे यांनीच याची खानेसुमारी करण्याची मागणी होत आहे.