Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

युपीएससीत महाराष्ट्राचे ९० जण चमकले. पुजा मुळ्ये राज्यात पहिली, तर तृप्ती धोडमिसे दुसरी दलित समाजाचा कनिष्क कटारिया देशातून पहिला, मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख देशातून पाचवी, सातारच्या तीन युवकांनीही मारली बाजी

मुंबई/दि/
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन २०१८ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया या दलित तरूणाने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मध्य प्रदेशची सृष्टी देशमुख ही देशातून पाचवी व महिलांमधून पहिली आली आहे. महाराष्ट्रातून पुजा मुळ्ये हिने पहिला (देशातून ११ वा) क्रमांक पटकावला आहे. तृप्ती धोडमिसे हिने राज्यातून दुसरा व देशातून सोळावा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ९० तरूणांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यात ७० जणांनी युनिक अकॅडमीकडून प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्रातून पहिल्या स्थानावर असलेली पुजा मुळ्ये ही निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या आहे. वडिलांप्रमाणेच तिनेही प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. आपल्या मुलीच्या या यशाचे ज्ञानेश्वर मुळे यांनी फेसबुकवरून कौतुक केले. महाराष्ट्रात तिस-या स्थानावर असलेला वैभव गोंदवे देशात २६ व्या क्रमांकावर आहे.
स्नेहल धायगुडे व विक्रम विरकर या अन्य दोघा सातारकरांनीही देशातून अनुक्रमे १०८ व ३४७ व्या क्रमांकावरून यश संपादन केले आहे.
आयोगाने एकूण ७५९ जागांसाठी ही निवड केली आहे. यात १८० आयएएस व १५० आयपीएसचा समावेश आहे. ग्रुप ए मधून ३८४, ग्रुप बीमधून ६८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. परीक्षेचा निकाल ुुु. र्ीिील.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.