Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळींमध्ये मोठी वाढ

hungery people poverty india

नवी दिल्ली/दि/ भूकबळी संपविण्यासाठी कटिबद्ध आणि प्रयत्नशील असलेल्या देशांच्या यादीत भारत आता आणखी मागे पडल्याचे दिसत आहे. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’चा २०१८ सालासाठीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी या यादीत भारत १०० व्या स्थानावर होता. विशेष म्हणजे भूकबळी संपविणार्या देशांच्या या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता. आता हे स्थान खूपच पिछाडीवर गेल्यामुळे, मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

                केंद्रातील मोदी सरकारला देशातील भूकबळी ही समस्या आव्हान ठरताना दिसत आहे. कारण, ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालामध्ये भारत सातत्याने मागे पडताना दिसत आहे. या यादीत २०१४ साली भारत ५५ व्या स्थानावर होता.त्यानंतर, सन २०१५ मध्ये हे स्थान ८० पर्यंत जाऊन पोहोचले होते. तर २०१६ मध्ये ९७ आणि २०१७ मध्ये १०० व्या स्थानी, अशी घसरण भारताची झाली आहे. मात्र, यंदा म्हणजेच २०१८ मध्ये भारत या यादीत १०३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर या यादीत पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे. पण, ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो, तो (पान २ पहा)

                (पान १ वरून) चीन या यादीत २५ व्या स्थानावर आहे. त्यामुळे गेल्या ४ वर्षांचा अभ्यास केल्यास, देशातील भूकबळी संपविण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

                ग्लोबल हंगर इंडेक्सकडून जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळींचे आकलन करण्यात येते. भूकबळी कमी करण्याच्या लढाईतील प्रगती आणि समस्या यासंदर्भात दरवर्षी एक सर्वेक्षण केले जाते. देशातील किती नागरिकांना गरजेनुसार जेवण मिळत नाही, याचा अहवाल या संस्थेकडून तयार केला जातो. म्हणजे, देशात किती प्रमाणात कुपोषण आहे, याचा अभ्यास या संस्थेकडून केला जातो. त्यामध्ये ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिमुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे. तसेच यामध्ये बालमृत्यू दर किती आहे, हेही तपासले जाते.